<
नाशिक-(प्रतिनिधी)- सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वर्षा लहाडे यांचे महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या वतीने आभार मानन्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, मागील दहा दिवसांपूर्वी एस.टी. कामगार सेनेतील एका कर्मचाऱ्याची पत्नी सिमा शरद खोडीलकर वय ६५ यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला होता. त्यांनतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पूर्वीचेच रुग्ण दाखल असतानांही डॉ. लहाडे यांनी तेथील नगराध्यक्ष किरण उगळे व राजा वाजे यांच्या विनंतीस मान देऊन सदर रुग्णाला दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. सदर रुग्णाला व्यवस्थित उपचार देऊन परवा घरी सोडण्यात आले. रुग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य त्यांनी सत्यात उतरवले. तुमच्या सारखे प्रामाणिक, हुशार, अनुभवी अधिकारी सिन्नर प्रशासनास लाभले, हे सिन्नर वासियांचे भाग्यच..! असे गौरवोद्गार काढत महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या वतीने डॉ. वर्षा लहाडे यांचे आभार मानन्यात आले व तसे आभार पत्रच त्यांना देऊन आभार व्यक्त केले.