Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना निर्बधाच्या कालावधीत दस्तनोंदणीस उपस्थित राहणे हे वैध कारण समजावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दस्त नोंदणीसाठी नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा – सह जिल्हा निबंधक सुनील पाटील


जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 – मुद्रांक विभागामार्फत मुद्रांक शुल्क सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. त्यास अनुसरून पक्षकारांनी बऱ्याच प्रमाणात या सवलतीचा फायदा डिसेंबर 2020 पर्यंत घेऊन मुद्रांक शुल्क खरेदी करून दस्त निष्पादित करून ठेवले आहेत. नोंदणी अधिनियमाच्या कलम 23 प्रमाणे निष्पादित केलेले दस्त पक्षकारांना दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये निष्पादनाच्या दिनांकापासून चार महिन्यात दाखल करणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा दोस्तांना कलम 25 प्रमाणे पुढील चार महिन्यांमध्ये नोंदणीच्या अनुक्रमे अडीच, पाच, साडेसात व दहापट एवढी मोठी शास्ती भरावी लागेल. पक्षकारांना शास्तीची रक्कम भरावी लागू नये म्हणून नोंदणी महानिरीक्षक, पुणे यांच्या 6 एप्रिलच्या पत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर 31 डिसेंबर, 2020 पर्यंत निष्पादित केलेल्या दस्ताची नोंद करण्यास पक्षकारांनी उपस्थित राहणे हे वैध कारण असल्याचे समजण्यात यावे. व त्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेले दिनांक व वेळेचे पात्र ग्राह्य धरण्यात यावे असे महसुल व वन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यात कोविड-19 विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असल्याने कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन यांच्या आदेशान्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कलम 144 व रात्रीची संचारबंदी लागू केली असल्याने वैध कारणांशिवाय कोणालाही सार्वजनिक ठिकाणी ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.


अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणी कार्य, (व्यवहार) सेवा यांना बंदी घालण्यात आली आहे. केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाची कार्यालये त्यांच्या संबंधित प्राधिकरणे व संघटना यांची कार्यालये सुरू ठेवण्यास सूट दिलेली आहे. त्याअनुषंगाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त असलेले दुय्यम निबंधक कार्यालयेही सुरू ठेवण्यात आली आहेत.


तरी डिसेंबर 2020 पर्यंत या सवलतीचा फायदा घेऊन मुद्रांक शुल्क खरेदी करून दस्त निष्पादित करून ठेवलेल्या नागरीकांनी कोरोना निर्बधांच्या नियमावलीचे पालन करुन 30 एप्रिलपूर्वी आपले दस्त नोंदवून घ्यावे, असे आवाहन सुनील पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-2, जळगाव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ. वर्षा लहाडे यांचे महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेने मानले आभार

Next Post

युवकांनी ऊत्स्फुर्तपणे आधी रक्तदान करून मग कोविड-१९ लस घ्यावी-भरत गायकवाड

Next Post
युवकांनी ऊत्स्फुर्तपणे आधी रक्तदान करून मग कोविड-१९ लस घ्यावी-भरत गायकवाड

युवकांनी ऊत्स्फुर्तपणे आधी रक्तदान करून मग कोविड-१९ लस घ्यावी-भरत गायकवाड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d