<
कोरोनाच्या पाश्चभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये प्रभाग क्रमांक 114 चे नगरसेवक व विभाग प्रमुख व भांडुप विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शाखाप्रमुख राजेश कदम यांच्या अथक परिश्रमाने आज दि 2 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, भा़डुंप पश्चिमेकडील रामकली विद्यामंदिर या शाळेच्या भव्य सभागृहात महाविक्रमी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना शाखा क्रमांक 114 च्या शिवसैनिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्कृष्ट नियोजन केल्याचे पाहण्यात आले.
रक्तदानासाठी आलेल्यांची सर्वप्रथम नोंदणी झाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली त्यानंतर तपासणी देखील केली. रक्तदान करण्यापूर्वी ज्या आवश्यक बाबी असतात याबाबत रक्तदात्यांकडून डॉक्टरांनी सविस्तर माहिती घेतली.
कोरनोच्या संदर्भात आवश्यक त्या बाबींची खातरजमा केल्यानंतर
यापूर्वी ,आपल्याला कोणते आजार आहेत याचीही माहिती डॉक्टरांनी घेतली. राजावाडी रुग्णालय व जुपिटर रूग्णालयाच्या डॉक्टर्स व स्टाफचे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
.सदर शिबिरात आमदार रमेश कोरगावकर यांच्या मुख्य उपस्थितीत भांडुप विधानसभा मतदार संघातील असंख्य स्थानिक नागरिकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 238 रक्तदात्यांनी महा विक्रमी रक्तदान करून
रक्तदान शिबीर यशस्वी केले.
या शिबिरात तरुण-तरुणी युवक-युवती व असंख्य महिलांचा सहभाग होता.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रभाग क्रमांक 114 च्या सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी अविश्रांत मेहनत घेतली यांचें मला समाधान होते. असे गौरवोद्गार आमदार रमेश कोरगावकर यांनी काढले.
या वेळी भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक ,नगरसेविका,उप विभाग प्रमुख, महिला संघटक, सर्व शाखा प्रमुख ,सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख ,ज्येष्ठ शिवसैनिक ,युवा सेनेचे सर्व पदाधिकारी , यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.