<
यावल(प्रतिनिधी)- येथील रा.स्व.संघ स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने ५ मे रोजी गंगेश्वर महादेव मंदिर परिसर गंगानगर यावल येथे सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या राज्यातील सर्व नागरिक लस घेण्यास प्राधान्य देतं आहे. पण, एकदा लस घेतली की नंतर किमान दोन महीने रक्तदान करता येणार नाही. मग राज्यात रक्ताची कमतरता भासेल. सध्या राज्यात ऑक्सिजन आणि रेमडिसेव्हर वरून महाभारत चालू आहे. तसंच महाभारत येणाऱ्या काळात रक्तासाठी होईल. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी आपण रक्त किंवा त्याला पर्याय निर्माण करू शकलो नाहीत. याकरिता सध्याची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यावल शहरातील नागरिकांनी स्वेच्छा रक्तदान करावे असे आवाहन जतीन बारसे, रुपेश वारके, अनिकेत सोरटे यांच्यावतीने करण्यात आले आहे.