<
जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे
आज जामनेर तालुक्यात एकूण 4350 कोविशिल्ड लसीचा साठा प्राप्त झाला.
ग्रामीण रुग्णालय पहुर ला 500,उपजिल्हा रुग्णालय जामनेरला 700 डोस तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना 3150 डोस चा लस साठा प्राप्त झाला आहे.
हा लस साठा 45 वर्षे वरील व्यक्तींनाच वापरण्यात येणार आहे.
दुसरा डोस असणाऱ्यांना प्राधान्याने डोस देण्यात येणार आहे.
प्राप्त साठ्याच्या 30% पेक्षा अधिक पहिला डोस देण्यात येऊ नये अश्या सुचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार लसीकरणा साठी टोकन प्रणाली चा अवलंब करण्यात येणार असल्यामुळे 90 दुसऱ्या डोस च्या व्यक्तींना टोकन वाटप झाल्यानंतर त्यांना नंतर टप्प्याटप्याने बोलवण्यात येणार आहे.
राहिल्यांना दुसऱ्या दिवशी टोकन देण्यात येईल.
यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळता येणार आहे.
18 ते 44 वर्षासाठी कोव्हकॅसिन लसीचा पुरवठा होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय जामनेर ला 400,प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी ला 200 डोस प्राप्त होणार आहे.18 ते 44 वर्षे वयाच्या लसीकरणासाठी पहिले ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
18 वर्षे ते 44 वर्षे लसीकरण मोहिमेचा जामनेर व शेंदूर्णी येथुन शुभारंभ होणार आहे.
यानंतर टप्या टप्याने लसीकरण साठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता नियमानुसार च लसीकरण पूर्ण करावे व आरोग्य यंत्रनेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.