<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील माजी विधान परिषद सदस्य डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या लग्न वाढदिवस निमित्त आज जी मॉलचे उदघाटन करण्यात आले. प्रसंगी रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर जयश्री महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, मा. मंत्री गुलाबराव देवकर, मा. आमदार मनिष जैन यांची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी जळगाव शहरातील खाजगी लोकसंघर्ष मोर्चा कोवीड केअर सेंटर, मनियार बिरादरी कोवीड केअर सेंटर, जिल्हा महिला सामान्य रुग्णालय मोहाडी कोवीड केअर सेंटर संचलित मराठा पाटील, लेवापाटील क्रिकेट लिग संघ या तिन कोवीड केअर सेंटर, जळगाव शहरातील कलावंत विनोद ढगे यांनी धान्य व किराणा सामान देऊन सुरवात करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य पवन सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हासरचिटणीस अशोक पाटील, मा. नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनिलभैय्या माळी, मनोज आहुजा, सुहास चौधरी, लखिराम जेटाणी, दिलीप माहेश्वरी, लोकसंघर्ष मोर्चा कोवीड केअर सेंटरच्या वतीने सचिव सचिन धांडे, सहसचिव भरत कारडीले, मनियार बिरादरी कोवीड केअर सेंटरच्या वतीने फारुख शेख, महिला कोवीड केअर सेंटरच्या वतीने अशोक पाटील, अखिल भारतीय कलावंत परिषदच्या वतीने विनोद ढगे आदी मान्यवराच्या हस्ते गंहु, तांदूळ, तेल किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.