<
{ईद-उल- फितर} ईद- ए- मिलाद म्हणजे, अल्लाह चे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर, जगभर “ईद-ए-मिलादुन्नबी” हा सण इस्लामी वर्ष, हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लीम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल् फितर व दुसरी ईदुज्जुह ईद उल फितर, ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपआपसात बंधुत्वाचे सबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा हा सण अशी त्याची ओळख आहे. या उलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. ईद-उल-फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. फितर म्हणजे दान करणे. यात अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लीम शरीयत कायद्यातील माप-दंड आहे. पवित्र रमजान महिन्यात चद्र दर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्यदयापुर्वी अन्न ग्रहण केले जाते सुर्यास्त पर्यंत उपवास पाळला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात. या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. रमजान महिन्यात 30 दिवस कडक उपवास केला जातो. रमजान महिन्यात सूर्योदयाच्या दिड तास अगोदर मुस्लीम बांधव उठतात. थोडे खाऊन रोजाची सुरुवात होते. दिवसभर काही खात आणि पित नाही. सूर्यास्ता नंतरच जेवण करतात. त्यामुळे सहनशीलता वाढते. या दिवसात मुस्लीम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ईदला नवीन वस्त्रे परिधान करून मुस्लीम बांधव ईदगाह किंवा मशिदीत मध्ये नमाज अदा करायला जातात. अल्लाप्रती नमाज अदा केल्यावर नंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिगन घेऊन ईदच्या ईद- मुबारक हो… अशा शुभेच्छा देतात. या दिवशी घराघरात स्वादिष्ट जेवण बनविले जाते. शिर खुमा हा गोड पदार्थ श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाच्या घरात शिरखुमा बनविला जातो. मित्र परिवारात मिठाई व भेट वस्तु वाटल्या जातात. सांगता ही रमजान ईदने होते. रमजान ईद हा मुस्लिमाचा अत्यंत पवित्र सण आहे. रमजानचा पवित्र शुद्ध महिना सपल्यावर चंद्र दर्शन होताच शोव्वाल महिन्याची पहिली तारीख सुरू होते. हा दिवस म्हणजे रमजान ई ईद- उल फितर नावाने तो साजरा केला जातो. शोव्वालची चद्रकोर, एकीकडे आनंद व दुसरी कडे रोजे संपल्याचे सांगते. ही ईद लहान असते. ईदला अनाथ, गोरगरीब, बाधवांना ते मदत करतात. मित्र असो वा शत्रु ते दोघांची गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. ईद हा सण समाजात परस्परा विषयी उदारता, समता, विश्वबंधुत्व, सहानुभूतीचा संदेश देतो. बंधुभाव, एकात्मता, निर्माण करतात. तर दुसरी कडे राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि विश्वबंधुत्व यांची जोपासना करतात. प्रेम करुण व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे.
प्रा. संजय मोरे(अण्णा)
सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष सिंगनुर तालुका-रावेर, जिल्हा-जळगाव
भ्रमण ध्वनी 9421688111 9527322732 – 7058201111 .