<
जळगांव-(चेतन निंबोळकर)- जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला असून या उद्रेकामुळे जिल्ह्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. हा कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली केली असून जिल्ह्यातील नागरिक ती पाळत आहे. हे सर्व चालत असताना जळगांव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात शहराच्या मध्यभागी असलेल्या शहराचे आमदार राजुमामा भोळे यांचे निलम वाईन शॉप येथे चक्क बेकायदेशीर मद्य विक्री केली जात असल्याचे व्हिडीओ चित्रण स्थानिक माध्यम प्रतिनिधीनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. सदर व्हिडीओ चित्रण सर्वत्र व्हायरल झालं असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनावर बोट ठेवले आहे. एकीकडे गोर गरीब जनतेने छोटा व्यवसाय घेऊन रस्त्यावर बसल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना दंड देऊन साहित्य जमा केल जातं आहे. एकीकडे प्रशासनाकडून सर्वच बेकायदेशीर ठिकाणी कारवाई करण्यात येत असून दुसरीकडे चक्क मद्य विक्रीच्या दुकानांना मुभा देण्यात आली की काय? अशी चर्चा सामान्यांमध्ये सुरु आहे.
उपायुक्त वाहुळे यांची हुकूमशाही
सध्याच्या लॉकडाउन मुळे अनेकांचा रोजगार गेल्याने बरेच जन पोटापाण्यासाठी शहरातील रस्त्यांवर भाजीपाला विक्री करताना दिसत आहे.यातच मनपा उपायुक्त वाहुळे यांचा हुकूमशाही करतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यात दबंग अधिकार म्हणून ओळख मिळालेले वाहुळे अनेकांवर बेकायदा यंत्रणेचे बळ वापरून हुकूमशाही राबवत असल्याचे एका व्हिडिओत समोर आले आहे. अतिक्रमण विभाग हा महापालिकेचा सर्वात सक्रिय विभाग असून याची जबाबदारी उपायुक्त वाहुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र ते अतिक्रमण विभागाच्या नियमांच सोंग करुन लहान मुलांवर आपली हुकूमशाही दाखवत असल्याचे सदर व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्या या हुकूमशाही प्रकारमुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टिका होत आहे.