<
चिंचोली पिंपरी प्रतिनिधी श्री.विश्वनाथ शिंदे
दिनांक १५,५,२०२१ रोजी. २०० ते २५०रेशनकार्ड धारकांनच्या सह्यानचे निवेदन देण्यात आले. वि.का.सो.चिंचोली पिंपरी येथे स्वस्तधान्य दुकान. नं.६२ चालवले जात असुन मे महिन्यात सेल्समन ने धान्य वाटप केले त्या धान्य वाटप मशिन मधून गहू व तांदूळ तसेच चनादाळ यांची सुद्धा नोंद पावती वर होत होती परंत सेल्समन राशनकार्ड धारकांना फक्त गहू व तांदूळ देत होता ते धान्य वाटपात सुद्धा तफावत म्हणजे कमी प्रमाण धान्य देत असल्याचे सुद्धा रेशन कार्ड धारकांना दिलेल्या तक्रारी नोंद केली आहे. तसेच गेल्या मार्च महिन्य सुद्ध ५० रेशन कार्ड धारकांना रेशन दिले नाही. त्यांना सांगतिले गेले की तुमचे धान्य आले नाही व तुमचे बोटाचे ठसे येत नाही असे उत्तर दिले गेले . तसेच सामाजीक कार्यकर्ता श्री अनिल बाबुराव दाभाडे यांनी गेल्या ऑगष्ट सन २०२० या महीन्यात रेशन दुकानात ३ किंटल ५० किलो चनादाळ मिळाली होती, परंतु ऑगस्ट महिन्यात फक्त रेशन कार्ड धारकांना गहू व तादूळ दिले होते. परंतु चनादाळ शेवगे पिप्री येथील धान्य दुकानात उतरवली होती परंतू अनिल दाभाडे व गावातील सुजान नागरीकांनी सेल्समनला चनादाळी ची विचारना केली असता त्यानी शेजारील गावातून ३ किंटल ५० किलो चनादाळ आणली व रेशन वाटपानंतर १० दिवसांनी ती चनादाळ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना एक किलो प्रमाणे दाळी चे वाटप केले गेले म्हणून रेशन कार्ड धारकांना असे वाटते की मे महिन्या सुद्धा चना दाळ आली असेल आणि परस्पर तिची विल्हेवाट झाली असेल परंतू रेशन कार्ड धाराकांनी गावातीत बरेच नागरीकांनी व श्री अनिल दाभाडे सामाजीक कार्यकर्त स्वस्त धान्य दुकानात चनादाळी ५० किलो प्रमाणे दोन चनादाळी चे गोण्या आढळुन आल्या सेल्समन ला विचारणा केली असता मी पुढील महिन्यात चनादाळ वाटीण असे उत्तर मिळाले. सद्या कोरोणा महामारी मुळे गोर गरीब जनतेला शासनाकडून मोफत मिळणाऱ्या धान्यात सुध्दा अफरातफ होत असल्यामुळे रेशन कार्ड धारक लाभार्थी च्या लक्षात आल्यामुळे २०० ते २५० रेशन कार्ड धारक लाभार्थ त्यांच्या सह्यांचे निवेदन निवासी नायब तहसिलदार श्री कुंभार यांना निवेदन देण्यात आले. तरी गोर गरीबांना शासनाकडून मोफत मिळणारे सर्व प्रकाचे धान्य गहू तादूंळ व ज्वारी मका चना दाळ याचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा व सबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा गावातील जनतेतून होत आहे.