<
लॉकडाउन च्या काळात व्यवसाय बंदीमुळे आर्थिक मरकुटीस आलेल्या व्यापारी ना अर्थिक पॅकेज जाहीर करून मासिक 20 हजार मदत करावी व लवकरात लवकर लॉकडॉऊन उठवान्याबाबत वतीने तहसीलदार सागर ढवळे यांना माळी महासंघ व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे सुरवातीस अंशतः लॉकडॉऊन जाहीर करत व्यवसायावर निर्बंध घातले होते. या निर्बंधना अनुसरुन व्यासायिक कोरोनाच्या नियम व अटी पाळत व्यवसायकरीत असताना आपण लॉकडॉऊन कडक करीत राज्यात अत्यावश्यक सेवा व काही सेवा सोडून सगळ्या व्यवसायांना राज्यात बंदी घातली. सुरवातीला 15 दिवसाचा लॉकडाउन जाहीर केला गेला. व्यापारी बांधवाना लवकर लॉकडॉऊन संपेल अशी आशा असताना लॉकडॉऊन आजतागायत वाढवला गेला. 15 दिवसाचा कालावधी देत राज्य सरकारच्या वतीने कालावधी हा वेळोवेळी वाढवीला गेला आहे.
राज्यात अत्यावश्यक सेवा सुरू, शेती संबधित व्यवसाय सुरू, कर्मचारी ना वर्क फ्रॉम होम च्या नावे पगार सुरू, वाईन शॉप व बार यांची पार्सल सेवा सुरू आहेत.
मग फक्त कपडा व्यवसाय, कॉम्पुटर स्टोर, मोबाईल शॉप, हेयर सलून, बूट शॉप, इलेक्ट्रॉनिक, हॉटेल व उपहार गृह, पान स्टोअल, टेलर्स, जनरल स्टोर्स असल्या छोट्या मोठ्या व्यवसाय बंदी का? असा प्रश्न आता व्यापाऱ्यांना निर्माण होत आहे.
आजच्या परिस्थितीत लॉकडॉऊन मध्ये बंदी असणारे व्यावसायिक पुर्णतः मरकुटीस आले असून एका व्यापारीच्या कुटुंबातील सदस्य संख्या 10 ते 15 अशी असते आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, तसेच मुलांचे शिक्षण, परिवाराचे आरोग्यचे प्रश्न, दुकानाचे भाडे, व्यासायिक कर्ज त्या संबधीत हप्ते आदी प्रश्न त्या व्यवसायावर अवलंबून असतात.
तरी राज्य सरकारने या छोट्या मोठ्या व्यासायिकांविषयी सकारात्मकता भावाने विचार करीत लॉकडॉऊन काळात बंदी केलेल्या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करत मासिक 20 हजार ची मदत करावी जेणेकरून त्यांच्या आथिर्क अडचणी वर हातभार लागेल. कोरोनाचे सर्व नियम अटी पाळत व्यापारी व्यवसाय करतील तरी शासनस्तरावर निर्णय घेऊन लवकरात लवकर लॉकडॉऊन उठवन्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर भडगाव व्यापारी असोशियन चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सागर महाजन, किरण शिंपी, सूर्यभान वाघ, विकास महाजन, आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत.