<
जळगाव – (प्रतिनिधी) – कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव च्या वतीने आज रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.माहे फेब्रुवारी २०२१ ते ७ मे २०२१ अखेर मागासवर्गीय पदोन्नती बाबत वेगवेगळे शासन निर्णय झालेत शासनाकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची वारंवार अशी मागणी आहे की,मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी मागासवर्गीयांना पदोन्नती बाबत दिलेल्या निकाला वर मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.त्यांचा जो निकाल होईल यास अधीन राहून ३३ टक्के पदोन्नतीने जागा भरा अन्यथा ३३ टक्के जागेसाठी मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत रिक्त ठेवा अशी मागणी संदर्भ क्रमांक ५ अन्वये कास्ट्राईब कर्मचारी महासंघानी केली आहे.तरी दिनांक ७/५/२०२१ चा शासन निर्णय रद्द न झाल्यास नाईलाजस्तव जळगाव जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी न्याय पद्धतीने आंदोलन करतील.याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पदोन्नती संदर्भात सुधारित आदेश निर्गमित होणेसाठी विनंती आहे. यासंबंधीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी रवींद्र तायडे (जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ) पुलकेशी केदार (जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब ,जि. प .कर्मचारी संघटना) बापू साळुंके (जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना )ब्रम्हानंद तायडे ( जिल्हा सचिव महासंघ) साधना बाविस्कर (जिल्हा उपाध्यक्ष महासंघ) विलास डोंगरे (उपाध्यक्ष महासंघ) योगेश अडकमोल (सहसचिव महासंघ) संदीप हिरोडे (कार्याध्यक्ष कास्ट्राईब भुमिअभिलेख संघटना) राजू कुमावत (उपाध्यक्ष महासंघ) रवींद्र गायकवाड (सदस्य महासंघ) डी. एच. भास्कर (सदस् महासंघ) हे पदाधिकारी उपस्थित होते.