<
जळगाव -(प्रतिनिधी) – येथील एस. एस. मणीयार विधी महाविद्यालय, आयक्यूएसी च्या वतीने दि. १७ ते २२ मे दरम्यान एक आठवड्याचा ऑनलाईन प्रात्यक्षीक प्रशीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केसीई सोसायटीचे संयूक्त सचिव ॲड प्रमोद पाटील हे लाभले होते. यावेळी नंदूरबार येथील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी यांची सन्माननीय उपस्थीती लाभली. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बी. युवाकूमार रेड्डी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. डी.आर.क्षीरसागर, डॉ. विजेता सिंग, डॉ. रेखा पाहुजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. अंजली बोंदर उपस्थीत होते.
यावेळी ॲड. प्रमोद पाटील यांनी विधी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षीक प्रशीक्षणाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे अधोरिखीत करून लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयाने राबविलेला हा ऑनलाईन उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे कौतूक त्यांनी केले. तदनंतर डॉ. चौधरी यांनी लॉकडाऊन मूळे विधी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक ज्ञान मिळवण्यात येत असलेल्या अडचणी स्पष्ट करून ऑनलाईन उपक्रमाची अवश्यकता स्पष्ट केली.
एक आठवड्याच्या या उपक्रमात ॲड रविंद्र पाटील, ॲड आनंद मुजूमदार, ॲड सौरभ मुंदडा, ॲड सुरज जेहांगीर या जिल्हा न्यायालयातील वकीलांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.युवाकुमार रेड्डी, डॉ. विजेता सिंग यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मूट कोर्ट आणी ड्राप्टींग, प्लीडींग आणी कन्व्हीन्सींगच्या विविध घटकावर मार्गदर्शन करण्यात आले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी.आर. क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व शेवटी डॉ. रेखा पाहुजा यांनी सहभागी मान्यवरांचे आभार मानले.