Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी उपमहापौरांचा हट्ट का?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

सार्वजनिक कार्यक्रम करायचे कुठे? असा नागरिकांचा सवाल

जळगाव -प्रतिनिधी : येथील पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 च्या ओपन स्पेस (खुली जागा) जागेवर महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर करण्यात आला. परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता ठराव मंजूर केल्याने नागरिकांनी रुग्णालय बांधण्यावर हरकत घेतली आहे.तसेच ऑनलाइन महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी विरोधात मत व्यक्त केलं असताना सत्ताधाऱ्यांनी त्यांची कोणतीही दखल न घेता ठराव मंजूर करून घेतला.

या परिसरात रुग्णालय बाधण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न व पाठपुरावा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीच केल्याने त्याचा इतका हट्ट का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 च्या ओपन स्पेस (खुली जागा) ही जागा स्थानिक राहिवाश्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम करणे, वयोवृद्ध यांच्यासाठी व बालकांना खेळण्यासाठी तसेच महिलांना विविध कार्यक्रम करण्यासाठी ही जागा सोडलेली असते.मात्र गेल्या महिन्याभरापासून उपमहापौर कुलभूषण पाटील हे रुग्णालय बांधणार तर सोनी नगरलाच असा हट्टीपणा करीत आहे.
वास्तविक पाहता पिंप्राळा परिसरातील वैकुंठधाम समोरील संत मीराबाई नगर परिसरातील डीपी प्लान नुसार आरक्षित जागा आहे.तसेच तत्कालीन नगराध्यक्ष
प्रदीप रायसोनी असताना सर्व नगरसेवकानी मिळून पिंप्राळा परिसरातील सोमाणी संकुलच्या वरील जागेवर दवाखाना बांधण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि तो मंजूर झाला होता.
पिंप्राळा हुडको परिसरातील 3 एकर जागा मनपाची जागा पडून आहे. तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या राहत्या परिसरातील मनपाच्या नावे असलेले खुली जागा (ओपन स्पेस) पडून आहे. या जागेवर रुग्णालय न बांधता महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर करण्यात आला. हे सर्व उपमहापौर यांनीच घडवून आणले असल्याचा आरोपही नागरिकांनी केली.
याप्रकरणी परीसरातील नागरिकांची हरकत असून याबाबत नागरिकांच्या सह्याचे निवेदन आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, भाजपाचे नगरसेवकांना निवेदन दिले आहे. तरीही या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही . त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत

तरी महापालिका, जिल्हा प्रशासनाने दखल घेत रुग्णालय इतरत्र भागात बांधावे, सोनी नगरच्या मोकळ्या जागेत बांधू नये अशी मागणी ज्ञानेश्वर ताडे, नरेश बागडे, निलेश जोशी, जि.एस.शिंपी, सोपान पाटील, सोनू शर्मा, लाभेश पाटील, दिपक पाटील ,अजय पाटील यांनी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दहावी परीक्षा शुल्लक परत करा-भोसले

Next Post

महा समृद्धी महिला सक्षमीकरणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने महिलांना केले स्वावलंबी-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

Next Post
महा समृद्धी महिला सक्षमीकरणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने महिलांना केले स्वावलंबी-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

महा समृद्धी महिला सक्षमीकरणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने महिलांना केले स्वावलंबी-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d