<
जळगाव (धर्मेश पालवे):-कोव्हिड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकर मायकॉसिस. आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं हा आजार काय आहे, आणि कोणाला या आजाराचा जास्त धोका आहे.
काळ्या बुरशीचा आणि पांढऱ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना कसे हाताळावे, उपचार कसा करावा,कोणती काळजी घ्यावी, कुणाला हा आजार होऊ शकतो आदी याबाबत आपल्या जळगाव जिल्ह्यातील व सध्या मुबईत रुग्ण सेवा देणारे नाक कान घसा तज्ञ डॉ श्वेतल महाजन -चोपडे यांनी आपल्या मार्गदर्शन पर चित्रणात सत्यमेव जयते कडे जिल्ह्यातील रुग्णांना अवेअरनेस फॉर जळगाव करिता भेट दिली.त्या काय म्हणाल्या , हा आजार नेमका काय आहे हे समजून घेऊयात.