<
नविन मिटर संदर्भात संतप्त नागरीकांचा मोर्चा
भुसावळ (प्रतिनिधी)- कोणतीही पूर्व सूचना न देता परस्पर (रेडीओ फिक्वेन्सी वीज मीटर) नविन विज मिटर बसवून ग्राहकांना जास्तीत जास्त विज बिलाचा भुर्दड लादला आहे. नविन विज मिटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल येत आहे .आजपर्यंत नागरिकांसह विविध संघटनांनी याबाबत विजवीतरण अधिकारी व संबंधिताना अनेक तक्रारिंसह लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र, त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून येथील उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटना व जेष्ठ नागरिकांतर्फे येथील तापी नगर भागातील विज वितरण कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला.यावेळी विजवितरण कार्यालयासमोर संतप्त नागरिकांनी विजवितरणच्या या मनमानी कारभारा विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने करीत कार्यकारी अभियंता पी.आर.घोरुडे यांना घेराव घालत पूर्ववत जुने वीज मीटर बसवण्याची मागणी केली.
अधिकारी यांचेसोबत चर्चा ; कारवाईचे आश्वासन
स्थानिक अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथून मोर्चास सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य मार्गाने तापी नगरात विज कार्यालयावर जाऊंन धडकला . यावेळी विज वितरण अधिकारी यांचेसोबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले . शहरातून वाढीव वीजबिल व फॉल्टी वीज मीटरच्या साडेचार हजार तक्रारी असल्याचे ग्राहकांनी सांगितल्यानंतर घोरुडे यांनी केवळ शंभर ते दीडशे तक्रारी असून त्यांचा निपटारा केला जात असल्याचे सांगितले व आश्वासन दिले .
भुसावळ तालुका शिवसेनेचा पाठीबा
नविन मिटर अतिशय जोरात फिरते यामुळे रीडिंग जास्त व ओघाने बिल सुद्धा जास्त येते याचा प्रत्येक विज ग्राहकाना व अतिशय त्रास होत आहे . या बाबीचे समर्थन भुसावळ शिवसेनेने केले असून या मोर्चेकऱ्याना व आन्दोलकर्त्याना पाठिंबा दिला आहे . यावेळी समाधान महाजन , निलेश महाजन यांचेसह प्रविण सिंग पाटिल,व संघटनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक व नागरिक व महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या .
निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
येत्या आठवड्यात कोणताही निर्णय न दिल्यास तिव्र आंदोलन व निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा इशारा सुद्धा मोर्चेकर्यांच्यावतीने यावेळी देण्यात आला आहे.