<
जळगाव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( Social ) ची केंद्रीय व राज्य कार्यकारणी ची बैठक दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी भुसावळ या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( Social ) चे राष्ट्रीय अध्यक्ष मेघराज काटकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष सचिन गजभिये, राष्ट्रीय प्रवक्ते संजय बौद्ध, कर्नाटक राज्यातील सुनील कांबळे , महादेव कांबळे, नागपूर चे शिरीष धनदरवे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी चकल
राज्य कार्यकारणी निवडीसाठी साठी ठराव मांडण्यात आला. यात 2021 ते 2023 च्या या वर्षासाठी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष म्हणून जळगाव जिल्ह्यातील समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांची निवड बैठकीत एकमताने करण्यात आली. त्याबद्दल अधिकृत निवडीचे मेघराज काटकर यांचे सहीचे पत्र आज रोजी विजय निकम यांना प्राप्त झाले आहे. विजय निकम यांच्या निवडीने एक अभ्यासू चळवळीतील प्रमाणिक होतकरू तरुणाला संधी मिळाली आहे. ही एक प्रकारे जळगांव जिल्ह्यातील चळवळीसाठी आनंदाची बाब आहे. विजय निकम यांनी पत्रकारांशी दूरध्वनी वरून वार्तालाप करीत असताना सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( Social ) हा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित घटनेला महत्व देतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लिखित घटनेप्रमाणेच पक्ष कार्यरत असला पाहिजे. आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा RPI जनतेसमोर आणणार आहोत. समान न्याय, समान संधी, स्वातंत्र्य, स्व विकास , शोषण मुक्ती , दास मुक्ती ,लोकशाही या सात तत्वावर या पक्ष कार्य करील ही सात तत्वच पक्षाचा मुख्य जाहीरनामा आहे.
विजय निकम यांच्या निवडी मुळे त्यांचे महाराष्ट्र राज्यातून अभिनंदन होत आहे.