<
जळगाव -(प्रतिनिधी)- कुरंगी तालुका पाचोरा येथील वाळू ठेक्याची माहिती जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती, कुठल्याही प्रकारची माहिती न मिळाल्यामुळे तहसील कार्यालय पाचोरा यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 19 प्रमाणे प्रथम अपील दाखल करण्यात आले होते.
सुनावणी घेऊन माहिती उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले होते .त्यानांतर काही दिवसांनी पाचोरा तहसील कार्यालयाने CCTV कॅमेरे च्या फुटेज सीडी व मंडळ अधिकाऱ्यांनी केलेला तपासणी अहवाल इत्यादी माहिती पोस्टाने अर्जदारास पाठवण्यात आली. सादर माहितीच्या सीडी अर्जदाराने पाहिल्यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे .
सदर सीडी मध्ये सीसीटीव्ही फुटेज च नसल्याचे उघड झाले आहे .सदर सीडी मध्ये कॅमेरा द्वारे छायाचित्रण करून व्हिडीओ बनवले आहेत व असे भासवले आहेत कि या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ‘परंतु चोरी ती चोरीच असते’ , कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती जास्त दिवस लपत नसते.
माहितीच्या अधिकारात एकूण ६ DVD प्राप्त झाल्या आहेत .या ६ DVD मध्ये ९९% सारखाच डेटा असल्याचे देखील उघड झाले आहे. सदर प्रकरणामुळे तर महसूल विभाग किती भ्रष्ट आहे हे उघड झाले आहे .
कारण वाळू ठेक्यावर बसवण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज दर १५ दिवसांनी तहसीलदार व प्रांतधिकारी यांच्याकडॆ जमा करावे लागतात , कुरंगी वाळू ठेक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज जमा केल्यावर महोदयांनी पाहण्याची तसदी घेतली नाही कि ,डोळ्यांना अर्थजनाची पट्टी लावली होती?
कुरंगी वाळू ठेक्यावर एकही सीसीटीई कॅमेरा बसवण्यात आला नव्हता हे मात्र माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे . जेव्हा कुरंगी वाळू ठेक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नव्हते ,तेव्हा माननीय कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी व कर्तव्यदक्ष तहसीलदार नेमके होते तरी कुठे ?
वरील प्रकारामुळे महसूल विभागातील अधिकारी भ्रष्टच नाही तर आपल्या कर्तव्याशी बेईमान असल्याचे सिद्ध होते.
महसूल प्रशासनात कुणी इमानदार अधिकारी असेल तर या वरील प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी असे मत माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी व्यक्त केले आहे.