Wednesday, July 23, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसटी कोमात,शिवसेना जोमात – शिवराम पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2021
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
एसटी कोमात,शिवसेना जोमात – शिवराम पाटील

सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांची पत्रकार परिषद

जळगाव – (प्रतिनिधी ) – मागील युती सरकार मधे शिवसेनेचे रावते महाशय परिवहन मंत्री बनले. एसटी महामंडळ बरबाद करून शिवशाही बस परिवहन महामंडळ निर्माण करण्याची जबाबदारी रावतेवर सोपवली होती. रावतेनी हजारो जगी बस एसटी डेपोत घुसळल्या. एकट्या भुसावळ ला ४४’ तर संपूर्ण महाराष्ट्रात किती असतील?परिणाम काय? जो रावतेच्या बुद्धी चा झाला. एसटी बस भंगारात पडल्या आणि शिवशाहीच्या बस रस्त्यावर धावल्या.असे करण्यात रावतेची बुद्धी कशी चालली असेल याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे संपूर्ण सीटी स्कॅन व नार्कोटिक्स टेस्ट केली पाहिजे. आणि आता तोच कित्ता आताचे दुर्दैवी परवहन मंत्री अनील परब करीत आहेत अशी माहिती जळगाव जागृत जनमंच चे शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अनिल परब हे परिवहन खात्याचा कारभार, विकास करण्यासाठी नियुक्त केलेत कि अन्य वेगळ्या हेतूसाठी हे माननिय मुख्यमंत्री उद्धवराव बाळासाहेब ठाकरेच सांगतील. मुख्यमंत्री बनणे ,मंत्री बनणे म्हणजे आधीचे बरबाद करून आपले इमले उभारणे,हाच हेतू असेल तर बादशहा बाबर ला तरी का दोष द्यायचा ?तर मग, दोघात साम्य असल्याचे धागेदोरे शोधावे लागतील असेही ते यावेळी बोलत हते.

आधीच महामंडळाच्या एसटी बस डेपोत धुळखात पडलेल्या असतांना शिवशाही च्या बस डेपोत डम्पिंग करून ठेवल्या.धड बायकोला बेसन खाऊ घालता येत नाही आणि सालीला पुरणपोळी चे अमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे. माझ्या नवऱ्याची बायको सिरीयलमधील गुरूनाथचा हाच स्वभाव येथे प्रकर्षाने जणवतो. एक दोन तीन.. पहिली, दुसरी धुळखात पडलेल्या असतांना पुन्हा ५००बस भाडेतत्त्वावर निर्णय घेणे म्हणजे गुरनाथशी स्पर्धा आहे.

केंद्रातील भाजप सरकारने १६ सरकारी औद्योगिक संस्था खाजगी केल्यात म्हणून टिका करतात.तेच धोरण महाआघाडी सरकार मधील मंत्री राबवत असतील तर तिकडे तमाशा आणि इकडे जलसा.आणि आम्ही खुशालचेंडू प्रेक्षक, कधी इकडे टाळी वाजवतो,कधी तिकडे.कधी इकडे हाळी ठोकतो कधी तिकडे

महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने नियोजनबद्ध डबघाईस आणून मंत्र्यांनी खरेदी केलेत. तसे महामंडळे डबघाईस आणून शिवसेना आपले शिवशाही महामंडळ चालवण्याचा प्रयत्न करीत आहे का?

सस्ती लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेनेचा हा बालीशपणा आहे कि गरीबांचे कल्याण करण्याच्या यातून स्वताचे घबाड भरण्याचा हा उद्योग आहे?हा प्रकार जनतेच्या लक्षात येईलच.तोपर्यंत
वीजमहामंडळ व एसटी महामंडळ बरखास्त झालेले असेल. तेंव्हा वीजकर्मचारी व एसटी कर्मचारी झुणका भाकर किंवा शिवथाळीच्या दुकानात रांगा लावलेले दिसतील.

आजरोजी मुंबईत बेस्ट च्या एसी बस फिरत आहेत.सीएसएमटी बस डेपोवरून मंत्रालय पर्यंत फक्त ६ रूपये भाडे लागले.जेथे सरळ सरळ २० रूपये भाडे आकारले पाहिजे. पण सस्ती लोकप्रियता मिळवण्यासाठी हे असे वात्रट धोरण असल्याबद्दल अनेक बसवाहकांनी कुरकुर केली.म्हणे आम्हाला खटकते पण नोकर मालकाविरोधात कसा बोलणार?बोललो तर उद्या घरी पाठवणार. आधीच शिवसेना लोकशाही मानत नाहीत. ठोकशाही मानतात.राष्ट्रवादी राजकीय आर्थिक व्यवसाय करण्यात गुंतलेले आहेत.कांग्रेस मृत्यूशय्येवर आहे.कम्युनिस्ट फक्त कार्यालयात आहेत.मनसे फुकट वकालत करीत नाही. वद जाऊ कुणा शरण ! अशी दयनीय अवस्था आमची झालेली आहे. जर हिंमत करून कोणी बोलले तर आधी सेनेचा मार,नंतर पोलिसात तक्रार, नंतर कोर्टात हेरझारा.बोलणाऱ्याची नरडीच दाबली तर राष्ट्रवादी, कांग्रेस मध्ये पडत नाहीत. ते म्हणतात,आमची दुकाने काचेची आहेत आणि यांच्या हातात दगड!

महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी राज्य तर आम जनतेचे आहे.तर मग मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री च्या चुकीच्या धोरणांना विरोध केला पाहिजे. वीजमहामंडळ, एसटी महामंडळ वाचवले पाहिजे. त्यासाठी रेमडीशिवीर,ऑक्सिजन पुरवला पाहिजे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या धोरणाला मुख्यमंत्री, राष्ट्रवादी, कांग्रेस ची सम्मती आहे काय?हे ताणून घेतले पाहिजे.आहे त्याच बस रस्त्यावर धावल्या पाहिजे. नवीन शिवशाही ला प्रवेश नको.

एसटी प्रवासाची ची संपूर्ण सवलत बंद केली पाहिजे.रोखीने तिकीट काढा आणि प्रवास करा.वृद्ध,पंग,शाळकरी,आमदार, खासदार,मंत्री ,पुरस्कारप्राप्त यांना सरकारने सरळ अनुदान द्यावे.त्याची तोषीश एसटी ला नको.

एसटी चे भाडे बस देखभाल,डिझेलखर्च ,पगार यांच्या समीकरणातून आकारले गेले पाहिजे.एका सीटवर एक प्रवासी असे विलगीकरण करायचे असेल तोपर्यंत दुप्पट भाडे आकारणी केली हिजे.

कोणतेही भाडे १०,२०,३०च्या राऊंडफिगर मधे घेतले पाहिजे. जळगाव पाळधी १५ असेल तर जळगाव पिंपरी २२ असेल तर ३० याप्रमाणे.
गावकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे मानसी ५०किलो पर्यंत सामान एका प्रवासी भाड्यात वाहून नेले पाहिजे.बसचे रनींग लोकेशन मोबाईल एप वर प्रदर्शित केले पाहिजे. ज्यामुळे प्रवासी ताटकळत बसणे टाळता येईल. बस येते,असे नक्की झाल्यावर खाजगी वाहन वापरणार नाही.

ज्या रोडवर पालकमंत्री चे रेतीचे डंपर पळवून खराब झाले ते दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेवली पाहिजे.

तात्पर्य एसटी महामंडळाच्या बस मुळे अनेक गावकरी, शेतकरी, सामान्य माणसाला प्रवास ते खंडित होऊ नये.त्यासाठी अनिल परब यांचे मंत्रीपद विखंडित झाले तरी चालेल.

परिवहन मंत्री म्हणून अनिल परब यांचे नवीन लालपरी भाड्याने घेण्यास जळगाव जिल्ह सेना आमदार गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील हे सहमत आहेत कि नाहीत जनतेला जाहिर सांगावे.कारण आम्ही तुम्हाला आमदार निवडून दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत.ते मुख्यमंत्री झालेत म्हणून अनिल परब परिवहनमंत्री बनलेत.आम्ही जळगाव जिल्ह्याती रहीवासी मतदार अनिल परब यांना ओळखत नाहीत.त्यांचे चित्र पाहिलेले आहे. आम्ही तुम्हाला ओळखतो.त्यामुळे तुम्ही शिवसेनेचे आमदार आंधळे, बहिरे,मुके बनू शकत नाहीत. कारण मंत्री चा नि नुदायिक सरकारचा निर्णय असतो.एकट्या अनिल परब यांचा असूच शकत नाही असे जळगांव जिल्हा जागृत जनमंचे शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत डॉ.सरोज पाटील, अजय पाटील, ईश्वर मोरे, कैलास महाजन, राकेश वाघ, अमोल कोल्हे, अनिल नाटेकर हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जादा दराने रासायनिक खताची विक्री-तीन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित

Next Post

अजित पवार हटावचा नारा देत आरक्षण बचावासाठी आरक्षण हक्क कृती समिती आक्रमक

Next Post

अजित पवार हटावचा नारा देत आरक्षण बचावासाठी आरक्षण हक्क कृती समिती आक्रमक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications