<
जळगाव – जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाशी संबधित विविध विषय, घटक आणि समस्यांकउे लक्ष वेधून त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतु आहे.
जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम इको सिस्टीम रिस्टॉरेशन अशी आ हेच निमित्त साधून. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वेगवेगळ्या विभागांच्या जसे यंत्र विभाग, विद्युत विभाग आणि पॉलिटेक्निक विभाग यांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या संकल्पनेच्या आधारे जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील यंत्र विभागामार्फत मेकॅनिकल इंजि.स्टुडंट असोसिएशनच्यायावतीने जागतिक पर्यावरण दिन गुगल मिटच्या माध्यमातुन व्हर्चुअली साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात जवळपास ११० विद्यार्थी उपस्थीत होते. यात विद्यार्थ्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातुन जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व विशद केले. तसेच सद्य परिस्थीतीमध्ये आपण पर्यावरणाचे रक्षण कसे करु शकतो, याबद्दल उत्कृष्ठ सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील यंत्र विभाग प्रमुख प्रा.तुषार कोळी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. तसेच अशाच प्रकारे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन महाविद्यालयात नियमित राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. जेणेकरुन विद्यार्थ्यांना संवाद व सादरीकरण कौशल्य वाढीस लागेल.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय एच पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करुन जागतिक पर्यावरण दिनाबद्दल सखोल माहिती दिली व अभियांत्रिकीच्या विविध शाखा व पर्यावरण संतुलन यांचा परस्पर संबंध याविषयावर भाष्य केले व त्या माध्यमातुन पर्यावरण र्हास कसा थांबवु शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. यंत्र विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रा.प्रविण पाटील, तसेच प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन वर्षा पाटील या विद्यार्थीनीने केेले.
तसेच पॉलिटेक्निक महाविद्यालयात आणि विद्युत अभियांत्रिकी विभागा यांच्य माध्यमातुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पॉलिटेक्निक महाविद्यालयाने राज्यस्तरीय टेक्निकल क्वीझ कॉम्पीटीशन चे आयोजन केले होते. ही स्पर्धा सर्व तंत्रनिकेतनच्या सर्व शाखांच्या विद्याथ्यार्र्ंसाठी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ७०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच प्रश्नमंजुषेनंतर विद्यार्थ्यांना ई-सर्टिफिकीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पॉलिटेक्निकचे प्रा.जुनेरिया शेख, प्रा.शुभम राठोड यांनी परिश्रम घेतले. त्यांना पॉलिटेक्निकचे समन्वयक प्रा.दिपक झांबरे, प्रा.कैलास मखिजा यांचे सहकार्य लाभले. तसेच अभियांत्रिकीच्या विद्युत विभागामार्फत इलेक्ट्रिकल इंजि.स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातुन इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती, त्यात १०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व त्यांनाही ई – सर्टिफिकीट वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रा.कोमल इंगळे यांच्यासह प्राध्यापकांनी सहकार्य केले. विभागप्रमुख पा.अतुल बर्हाटे यांनी मार्गदर्शन केले. र्व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आलेल्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय एच पाटील, उपप्राचार्य प्रा.प्रविण फालक, अॅकेडमिक डीन प्रा.हेमंत इंगळे यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थीत होते.