<
जळगांव(प्रतिनिधी)- आपल्या पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल, तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडे जसा पाहिजे, तसा आपला विकास साधुन घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. त्यामुळे ”पर्यावरण वाचवा” असे शब्द कानी पडत आहे. सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. पर्यावरणाचे प्रत्येक, व्यक्तीवर फार मोठे कर्ज आहे. ते कर्ज मला फेडायचे आहे.
असा प्रत्येकाने निच्यय केला पाहिजे. असाच निर्धार रावेर तालुक्यातील सिंगनुर या गावातील रहिवाशी सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.संजय मोरे(अण्णा) हे एक आगळा वेगळा उपक्रम तीन वर्षा पासुन आपल्या परिसरात राबवित आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वतःचे ट्रॅक्टर, पाण्याचे टॅकर घेऊन ड्रायव्हर समवेत रावेर तालुक्यातील, विविध भागांमध्ये, उन्हाळ्यामध्ये लहान रोपे पाण्याअभावी सुकली आहे. अशा रोपांना पाणी देऊन “जिवदान” देण्याचे काम प्रा. संजय मोरे (अण्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शक्ती सेना, राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात मोकळ्या जागेमध्ये, हि रोपे लावावी. पिंपळ ३४ तास, वड २० तास, कडुलींब १४ तास, “ऑक्सीजन” देतात. येत्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने कमीत कमी ५ झाडे आपल्या परिसरात लावावी. अन्ना शिवाय एक दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहु शकतो, मात्र हवेतील ऑक्सीजन, शिवाय आपण क्षणभर सुध्दा, जिवंत राहु शकत नाही. ऑक्सीजन, निर्मितीचे सर्वात मोठे कार्य, परिसरातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःहा तयार करतात. हवेतील कार्बनडायऑक्साइड म्हणजे, खराब हवा कायु शोषुन मानवास उपयुक्त असे ऑक्सीजन म्हणजे, शुद्ध हवा वायु हवेत सोडतात. त्यामुळे, वनस्पती व वृक्षाची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक, नागरिकाचे कर्तव्य आहे. आज रोजी, जंगलतोड फार मोठया प्रमाणात होतांना दिसत आहे.
वृक्षतोड, थाबविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. संपुर्ण, भारतदेशा सह संपुर्ण महाराष्ट्रामध्ये, कोरोनो या महाभयंकर आजाराने थैमान घातले असुन भारत देशा मध्ये, हजारो लोकांना ऑक्सीजन अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे, ऑक्सीजचे महत्व आता लोकांना अति महत्वाचे असल्याचे कळु लागले आहे. दवाखान्यात आपण लाखो रुपये, खर्च करून डॉक्टराना आपण देव मानतो. पण निसर्ग, आपणास विनामुल्य सर्व काळ ऑक्सीजन देतो.
निसर्गच हाच खरा देव असे मला वाटते. मला व माझ्या परीवाराला १ एप्रिल ते ७ मे पर्यंत कोरोनो या आजरामुळे दवाखान्यात भरती करण्यात आले होते. माझी ऑक्सीजन पातळी ७७ असल्यामुळे, माझा नवीन जन्म झाला. त्यामुळे ऑक्सीजन मुळेच मला जिवदान मिळाले. आजच्या कोरोनो, काळात कमी भासत असलेल्या प्राणवायुसाठी आपल्या अगणात एकतरी झाड लावुया. म्हणजेच, ऑक्सीजन साठी कधी आपणास रांगा लावाव्या लागणार नाहीत. ऑक्सीजन कधीच कमी पडणार नाही. झाडे लावा, झाडे जगवा, हे आपले पूर्वज सुध्दा, आपणास सांगून गेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… खरंच वृक्ष सोयरे, नातलग मित्र परिवारातील, नव्हे का? आजच्या जागतिक पर्यावरण दिना निमित्त प्रत्येक, नागरिकाने आपले कर्तव्य, समजुन वृक्षाचे महत्व सामान्यातल्या सामान्य माणसा पर्यंत पोहचविणे अत्यंत महत्त्वाचे, आहे.