Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवस्वराज्य दिनानिमित्त जळगाव जिल्हा परिषदेत उभारली शिवस्वराज्याची गुढी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शिवस्वराज्य दिनानिमित्त जळगाव जिल्हा परिषदेत उभारली शिवस्वराज्याची गुढी

जळगाव, (जिमाका) दि. 6 – शिवस्वराज्य दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील आणि उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करुन भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार येथील जिल्हा परिषदेत आज सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डी.आर.लोखंडे, बी.ए.बोटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर ढिवरे, उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम.देवांग यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. तसेच भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी सर्वांना स्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विनोद ढगे व सहकारी कलाकारांनी महाराष्ट्र गीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित न्यायदंडाधीकारी प्रथम वर्ग आणि नागरी सेवा स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Next Post

शिवराज्याभिषेका दिवशी ‘मी रक्तदाता’ संकल्पनेतून १३५ लोकांनी केले रक्तदान- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo