Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 12 अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 7 – जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 12 तक्रार अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने तहसिलदार जळगाव कार्यालयाकडे 4, तहसिलदार जामनेर-2, तहसिलदार पारोळा -1, तहसिलदार यावल -1, तहसिलदार चोपडा -1, तहसिलदार पाचोरा यांचेकडे 3 याप्रमाणे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपवनसंरक्षक विवेक होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख राजेंद्र कपोते, सहायक निबंधक मंगेशकुमार शहा, पोलीस उप निरीक्षक मकसुद शेख, वीज वितरण चे उप कार्यकारी अभियंता श्री. वाणी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. तर तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचेसह तक्रारदार नागरिक ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. आज प्राप्त अर्ज दाखल करुन घेण्यात आले व संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी 2 दिवसात पाठविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिलेत. या अर्जावर संबंधित विभागांनी कार्यवाही करुन पुढील लोकशाही दिनात पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चौपाटीसह शहरातील गस्तीसाठी आता अत्याधुनिक एटीव्ही वाहने

Next Post

दुकानदार, नागरिकांनी गर्दी करू नये : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ

Next Post

दुकानदार, नागरिकांनी गर्दी करू नये : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo