<
सुलज, (ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा)
COVID 19 या महामारीने महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश ग्रासल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यू झाल्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात नोंदणीकृत झाल्याचे आपण बघितले.
यामुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा प्रशासनाने संपूर्ण Lockdown कडक पद्धतीनें राबविण्याचा निर्णय घेतला, सदर कठोर निर्बंधांमुळे आणि प्राथमिक आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नामुळे गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे आढळले. सोमवार पासून काही अपवादात्मक गोष्टी सोडून महाराष्ट्रातील कित्येक जिल्हे LOCKDOWN मुक्त करण्यात आली आहेत. परंतु कोरोनाचा धोका टळलेला नसून सतर्कता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावात COVID 19 ची ANTIGEN तपासणी सतत सुरु आहे. सद्यःस्थिती ग्रामीण भागात शेतीची कामे आणि पेरणी पूर्व मशागती मोठ्याप्रमाणात सुरु असल्यामुळे ग्रामप्रशासनाने घरोघरी जाऊन ग्रामस्थांची ANTIGEN तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून लहान मुलांपासून वयोवृद्ध महिला पुरुषांनी कोरोना तपासणी शिबिरात हिरहिरीने सहभाग नोंदविला, आनंदाची बाब म्हणजे १११ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकही रुग्ण बाधित आढळला नाही. यामुळे सुलज कोरोना मुक्त गाव होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते, याचे श्रेय गेल्या काही दिवसांत कठोर निर्बंधाचे तंतोतंत पालन करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांना जाते, त्यासोबतच, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य सेविका यांनी वेळोवेळी आपले कर्तव्य सुद्धा प्रामाणिकपणे पार पाडत असल्यामुळे संसर्गाची लक्षणे आढळतच संबंधित व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करून तत्काळ तपासणी करून घ्या, जेणेकरून नियंत्रणात असलेली परिस्थीती हलगर्जीपणामुळे काही अघटीत घडू नये, यासाठी सतत प्रयत्नशील असतात. गावातील शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक आणि ग्रामप्रशासन सुलज या सर्वांच्या अथक प्रयत्नांने गावातील कोरोना संसर्गाचे सावट कमी झालेले दिसते, त्याचाच प्रत्यय आज संपूर्ण गावातील १११ रुग्णांची प्रत्येकाच्या घरी जावून COVID 19 Antigen तपासणी केली असता एकही व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचा अहवाल मिळाला.
आरोग्य तज्ञ आणि ICMR यांच्या निरीक्षणावरून कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून येत्या काही महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यामध्ये लसीकरण न झालेले वयोवृद्ध व लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे, त्यादृष्टीने लहान मुलांची तपासणी वाढविणे आणि त्याच्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन ठेवण्याचे आदेश आरोग्य मत्रलायकडून देण्यात आले आहेत. याबाबत सुद्धा तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रच्या डॉक्टरांनी सांगितले.
लहान मुलांना, महिलांना, वृध्दांना तपासणी आणि लसीकरण हे आपल्या आरोग्यासाठी खुप फायद्याचे आहे, याला घाबरु नका, त्याचा कोणताही त्रास आपल्याला होत नाही, त्रास होण्यापूर्वी काही लक्षणं दिसली तर ती घरच्याघरी बरी होऊ शकतात, असे प्रोत्साहन देवून परिसरातील सर्वांची तपासणी करण्यासाठी शिक्षणक्रांतीच्या राज्य समन्वयकांनी तयार केले.