Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या प्रयत्नांतून का.उ.कोल्हे विद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या प्रयत्नांतून का.उ.कोल्हे विद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू

प्रभाग क्र. 3, 17 सह 4 मधील नागरिकांना घेता येणार लाभ

जळगाव, ता. 10: शहरातील प्रभाग क्र. 3, 17 सह 4 मधील नागरिकांची ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लसीकरण करवून घेण्यासाठी परिसरात केंद्रच नसल्याने इतर केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दमछाक होत होती. त्यामुळे या भागातील नागरिकांसह युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशनचे कार्यकर्ते अमेय राणे यांच्याकडून महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्याकडे परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात सातत्याने मागणी होत होती. याचा गंभीरपणे विचार करून महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी जळगाव शहर महानगरपालिका, एल.के. फाऊंडेशन, युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन, जळगाव व मानराज इनोव्हेशन प्रा. लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार, दि. 10 जून 2021 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील जुन्या खेडी रोडवरील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करून ते नागरिकांसाठी खुले केले. या केंद्र उभारणीमुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली असून, केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सेवेसाठी उपलब्ध राहील.

लसीकरण केंद्र सुरू करतेवेळी प्रभाग क्र. 3 चे नगरसेवक श्री.प्रवीण कोल्हे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.रंजना सपकाळे, प्रभाग क्र. 17 च्या नगरसेविका सौ.मीनाक्षी पाटील, नगरसेवक श्री.सुनील खडके तसेच नगरसेविका पती श्री.कमलाकर बनसोडे, सौ.वानखेडे, नगरसेवक डॉ.विरन खडके यांच्यासह महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.रेशमा मुणोत, डॉ.मनीषा उगले, परिचारिका सुप्रिया कांबळे, मंगला तायडे, आशा स्वयंसेविका अर्चना पाटील, आशा लांडे यासह एल.के.फाऊंडेशन, युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन, मानराज इनोव्हेशन प्रा. लि. मुंबईचे सदस्य व जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की प्रभाग क्र. 3 मधील खेडी गाव, योगेश्वरनगर, वाल्मीकनगर, दिनकरनगर, तानाजी मालुसरे नगर, पीपल्स बँक कॉलनी, प्रभाग क्र. 17 मधील अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी, शांतीनिकेतन सोसायटी, रायसोनी शाळा परिसर, ट्रान्स्पोर्टनगर, म्हाडा कॉलनी, एस.टी. वर्कशॉप, सदोबानगर, कासमवाडी, पांझरापोळ परिसर तसेच प्रभाग क्र. 4 मधील जोशी पेठ, मारुती पेठ, बालाजी पेठ, राम पेठ, विठ्ठल पेठ या भागातील नागरिकांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लसीकरण करवून घेण्यासाठी परिसरात केंद्रच नसल्याने इतर केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दमछाक होत होती व विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात माझ्याकडे अमेय राणेंसह नागरिकांकडून बर्‍याच दिवसांपासून केंद्र सुरू करण्याबाबत मागणी होत होती. त्यावर यथोचित विचार करून आज काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयात हे केंद्र परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घेऊन लसीकरण करवून घ्यावे. आपत्कालीन सेवा म्हणून केंद्रावर युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशनने अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध करून दिली आहे. तसेच परिसरात ‘मी लस घेतली आपणही घ्या’ हा संदेश इतरांना देण्याकरिता आकर्षक सेल्फी पाईंटही उभारले आहे. लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक श्री.ललित कोल्हेंसह ज्या-ज्या स्वयंसेवी संघटनांनी सहकार्य केले त्या सर्वांचे महापौर यांनी आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

Next Post

‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतंर्गत जिल्ह्यात 15 ते 28 जून या कालावधीत फिरते न्यायालयाचे आयोजन

Next Post
‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतंर्गत जिल्ह्यात 15 ते 28 जून या कालावधीत फिरते न्यायालयाचे आयोजन

‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतंर्गत जिल्ह्यात 15 ते 28 जून या कालावधीत फिरते न्यायालयाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo