<
आपल्याला आपल्या समोरची एखादी प्रासंगिक बाब लक्षात आल्यावर किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समोर उभी दिसल्यावर आपल्या मनात त्या संदर्भात सखोल स्वरूप विषयी विविध प्रकारचे विचार मनात उदय पावतात हेच विचार मग काही क्षणांसाठी तासांसाठी किंवा विशिष्ट रुपी कालावधीपर्यंत आपल्या मनात स्थिर अस्थिर स्वरूपाची हालचाल करीत असतात. त्यासाठी आपण जोपर्यंत आपल्या स्वतःच्या बोलल्या मधून हेच विचार समोर मांडणी करून सांगत नाही किंवा एखाद्याशी चर्चा करीत नाही तोपर्यंत आपण जे पाहिलेले असते त्या विषयाच्या बाबतीमध्ये आपण विविध अंगांनी भावनात्मक विचारात्मक निरीक्षणात्मक स्वरूप चिंताजनक वैचारिक कल्पनाविस्तार स्वरूपाची असते व ही खदखद आपल्या मनात तेवत ठेवत असतो परंतु हीच बाब आपण आपल्या जवळच्या व्यक्ती जवळ काही वेळानंतर बोलून दाखवली तर त्यावर ती आपल्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्या समोरील व्यक्तीकडून आपल्यासमोर मांडून त्याविषयीची माहिती ते आपल्याला सांगतात यातून आपल्याला स्वतः एक सकारात्मक मोठा फायदा होतो. तो म्हणजे असा की आपण स्वतः समोरील निरीक्षण कसे करतो? किती विविध स्वरूपांत करतो? किती अंगांनी करतो किती ?ढोबळपणे करतो किती? सूक्ष्मपणे करतो? किती योग्यतेनुसार करतो? या सर्व बाबींची जाणीव आपल्याला होत असते.
यामधून आपल्याला निरीक्षणात्मक दृष्टिकोनामुळे आपल्यातील आत्मविश्वास आपण स्वतः तेवीत ठेवून त्याच्यात स्वयम् पणे वाढ करीत असतो आपला आत्मविश्वास वाढणे हे आपल्यासाठी बौद्धिक मानसिक निर्णयात्मक बाबींसाठी महत्वाचे आहे आपण जेव्हा एखादा विचार करायला सुरुवात करतो त्यावेळी तो विचार आपल्या मनामध्ये शिरकाव करण्यासाठी एखादा प्रसंग वस्तू किंवा समोरचा प्रत्यक्ष दिसणारा एखादा घटक त्या घटकाचे आपण करीत असणारे अचानकपणे निरीक्षण याच निरीक्षणातून समोरच्या एखाद्या घटका संदर्भात आपले मन विचार करते. आपले मन जसा विचार करते ,तसाच विचार आपण लेखणीच्या माध्यमातून किंवा लिखाण सोपे करून विविध अंगांनी त्याचे मांडणी सोशीयल मीडिया च्या द्वारे करतो. जर लिखाण करणे शक्य होत नसेल तर भाषणावर द्वारे समोरच्या लोकसमूहाला विविध ऐतिहासिक वर्तमानकालीन सामाजिक उदाहरणांच्या साहाय्याने आपले मत आपण मांडू शकतो अशावेळी आपल्या मनातील विचार मांडाव्यास आपण सुरुवात करतो ज्याप्रमाणे आपण किंवा लहान बाळ बालवयात असताना ते बाळ निबोलके असते. त्याला कोणत्याही अक्षराची किंवा शब्दाची तथा भाषेची ओळख सुद्धा नसते पण ते बाळ सुद्धा काहीतरी नवीन पाहीले कि स्वतः चाल करण्याचा प्रयत्न करते. आपल्या समोरची व्यक्ती जी कृती करीत आहे ती कृती तशीच्यातशी करण्याचा प्रयत्न ते बालक करते यामधून एक बाब प्रकर्षाने जाणीव करून देते की आपले निरीक्षण हे आपल्या बोलण्याला उत्तेजित करीत असते ही बाब त्या बालकाच्या बाल रुपी कृतीयुक्त क्री यावरून स्पष्ट होते. हेच लहान बाळ प्रथम आई ,मम्मी, या दोन अक्षरी दोन शब्दांचा उच्चार प्रथम स्पष्टपणे जरी करत नसला तरी आपल्या प्रयत्नाने जसे बोलता येईल तसे बोलते कारण मुलं लहान असताना ते जास्तीत जास्त वेळ आपल्या आईच्या सानिध्यात राहात असतात त्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्या आईविषयी आत्मिक संवेदना जागृत होते. यामधून त्यांची आई जसे शब्द बोलते तसेच शब्द ते बाळ सुद्धा प्रत्येक वेळी बोलण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक आई मुलाला आई हा शब्द सुरुवातीलाच बोलण्याचे शिकवण्याचा प्रयत्न करते .हाच शब्द त्याने कान पटलावर सतत ऐकल्यामुळे तो मुलगा किंवा मुलगी म्हणजेच ते बाळ” श्रावणाद्वारे”, ” निरीक्षणा” तून ती गोष्ट आत्मसात करून तसेच बोलण्याचा प्रयत्न करते. बोलता-बोलता सुरुवातीला थोडा अस्पष्ट उच्चार करून बोलण्याचा प्रयत्न सुरूच ठेवते. बोलता-बोलता तो बाळ थोडा अस्पष्ट बोलतो परंतु त्याच्या बोलण्यावर त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढत जातो पुढे एक दिवस तो मुलगा सहजपणे आपल्या मुखातून आईला स्पष्ट शब्दांमध्ये “आई “म्हणून हाक देतो. असाच विचार केल्यावर असे दिसून येते की जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या शालेय शिक्षणाला सुरुवात करतो त्यावेळी त्याला त्याच्या शालेय अभ्यासक्रमाच्या विषयीची किंवा त्याच्या भविष्यकाळाला बद्दलची कोणतीही साधी कल्पना सुद्धा स्वतःला नसते, परंतु थोडेफार काहीतरी शिक्षण करून भावी आयुष्यासाठी आपल्या पाल्याचे बरे व्हावे यासाठी आईवडील त्याला वय वर्ष सहा पूर्ण झाल्यावर शालेय शिक्षणासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देतात तेथे त्याचे गुरुजन मंडळी त्या मुलाला भाषा विषय शिकवितांना त्याला त्यांच्यामागे तसेच बोलायला लावतात ती मुलेसुद्धा गुरुजी प्रमाणे स्पष्ट उच्चार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सतत स्वतःच्या बोलण्याच्या सरावातून काही कालावधीनंतर म्हणजेच त्यांचा आत्मविश्वास वाढल्यावर नंतर त्यांच्या वाचनावर त्या मुलांचा विश्वास वाढत जातो त्यामुळे ती मुलं तो शब्द अत्यंत स्पष्टपणे आत्मविश्वासाने जोरात बोलतात. आपण आपले महाविद्यालयीन शिक्षण करताना एक विषय घेऊन पदवी मिळवतो परंतु या पदवी अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना त्यांच्या संदर्भात अनेक प्रकारची विविधांगी लिखाण असणारी पुस्तके विद्यार्थी म्हणून वाचन करावी लागतात या वाचनाच्या सवयीमुळे आपल्याला सध्याच्या परिस्थितीवर विचार करायला स्वयम् पणे जाणीव होत असते शालेय किंवा विद्यापीठ स्तरीय कथाकथन स्पर्धा, वकृत्वस्पर्धा, गायन स्पर्धा ,या स्पर्धांमधून आपण काय करू शकतो अशी प्रश्नार्थक मुद्दे समोर येऊन आपण विद्यापीठाच्या भाषण स्पर्धेत भाग घेऊन त्यावर आपले मत मांडण्याची संधी या महाविद्यालयीन जीवनात पाहतो. आपल्या वाचनातून आपले सामाजिक व शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण होऊन एक प्रभावी भाषण करायला असली हिंमत वाढते. यातून आपले विचार एका सरळ मुद्द्याला अनुरूप स्वरूपाचे भाषण करतात फक्त यासाठी आपले सामाजिक परिसरातील निरीक्षण हे एक कौशल्यपूर्ण असले पाहिजे ,कौशल्यपूर्ण निरीक्षणामुळे आपण आपले भाषण प्रभावीपणे करतो यातून आपलं मन मत प्रखरपणे समोरच्या व्यक्तीस पटवून देतो. म्हणून यासाठीच तर बोलणे हे निरीक्षणात्मक आत्मविश्वासाचे गमक आहे.
लेखक -श्री प्रशांतराज तायडे (सर)
मु. पो. कर्की ता. मुक्ताईनगर ,जि. जळगाव .मो.९६६५८३१५८१