<
जळगाव – (प्रतिनिधी) – १० जून रोजी झालेली स्थायी समिती सभा आणि १८ जून रोजी झालेल्या आरोग्य समितीच्या सभेत घेण्यात आलेल्या मुद्द्यांबाबत महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब महासंघाकडून प्रसिसाढी पत्रकाद्वारे खुलासा करण्यात आला आहे.
पंचायत समिती आणि मुख्यालयातील आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक ) यांनामुख्यालयातून बाहेर काढणे त्याचप्रमाणे पंचायत समिती स्थरावरील आरोग्य सेवक याना देखील बाहेर उपकेंद्र ठिकाणी नियुक्ती देणे , जिल्हा मुख्यालयातील तांत्रिक अधिकारी वकर्मचा-यांची सेवा ५ वर्षे पेक्षा जास्त झाली आहे अशा कर्मचा-यांना इतरत्र ठिकाणी बदली करणे बाबत मुददा उपस्थित केला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य कर्मचारी संघटनेचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे दिले आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातीन
कार्यालयात जिल्हा मुख्यालयी डी.पी .एच.एन., विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, ए.एन.एम., ओषण निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावर आरोग्य पर्यवेक्षक २ व आरोग्य सेवक यांचे तालुक्याचे ठिकाणी एक पद शासन आकृतीबंधानुसार मंजुर आहेत. त्यानुसार त्यांचे
लेखाशिर्षक मंजुर असुन त्यांचे वेतन व भत्ते त्याच ठिकाणी शासनाच्या नियमानुसार आहेत. त्यानुसारच आरोग्य विभागांतर्गत जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी डि.पी.एच.एन. ०२ , शितसाखळी तंत्रज्ञ ०१ , विस्तार अधिकारी ०१, आरोग्य पर्यवेक्षक ०४, औषध निर्माण अधिकारी ०१, आरोग्य सहाययक ०३ , आरोग्य सेवक ०२, आरोग्य सेविका १, अशी एकूण १५ पदे मंजुर आहेत त्याचप्रमाणे जिल्हा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत आरोग्य सहाय्यक ०२ , आरोग्य
सहाय्यीका ०२ पदे आहेत सदरची सर्व पदे जिल्हा मुख्यालयातील मंजुर पदे असुन सदरहु सर्व तांत्रिक संवर्गाची पदे असुन त्यांचेकडे जिल्हा मुख्यालयात १)आर.सी.एच.(माता व बाल संगोपन) बाल मृत्यू, माता मृत्यू, उपजत मृत्यू, ए.एफ.पी., ए.ई.एफ.आय., २) राष्ट्रीय कुटूब कल्याण ३) नवसंजिवनी ४) नियोजन ५) बोगस वैदयकिय व्यवसायीक ६) प्रसिदधी कार्यासन 7) मानव विकास ७ )साथरोग ८) प्रधानमंत्री मातृ सुरक्षा योजना ९) जननी सुरक्षा योजना १०)
प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ११ ) जन्व मृत्यू १२) शितसाखळी १३)औषधभांडार १४) कुटूंब कल्याण नुकसान भरपाई योजना १५) ओ.टी. व सर्जन अँक्रीडेशन १६) मुंबई नर्सिंग होम नोंदणी नुतनीकरण, १७) जिल्हा प्रशिक्षण केंद्रअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेणे ईत्यादी कार्यासनावर कार्यरत आहेत.
१) जिल्हा मुख्यालयातील कार्यरत वरिल सर्व तांत्रिक संवर्गाची पदे सोडुन व तेथे कार्यरत प्रतिनीयुक््तीवर असणा-या अधिकारी / कर्मचारी यांना सोडुन मुळ आस्थापनेवर कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांना वैयक्तीक स्वरुपाचा त्रास देण्याच्या हेतुने काही अधिकारी वर्ग हे सन्माननिय लोकप्रतिनीधी यांच्यामाध्यमातुन हेतुपूरस्कर पुर्वग्रह दुषीत ठेवुन व्देशभावनेने जिल्हा मुख्यालयातील फक्त दोन आरोग्य सेवकांचे मुख्यालयातील पदस्थापनेत बदल बाबत मुददा उपस्थित करुन त्यांचे बदलीची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे पंचायत येथे देखील मंजूर आकृतिबंधनुसार आरोग्य सेवकांची प्रत्येक तालुक्याला 1 पद मंजूर आहे, त्या ठिकाणी देखील आरोग्य सेवक त्यांना नेमून दिलेले कामे जॉब चार्ट प्रमाणे करत आहेत
२) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात दोनही आरोग्य सेवक यांचेकडे असलेल्याकार्यासनावर ते नियुक्तीपासुन ते विनातकरार उत्कृष्टपणे सेवा बजावत आहेत,आजतागायत त्यांचे कार्यालयीन कामकाजात त्यांची कोणतीही तक्रार नाही. ३) जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेले दोन्ही आरोग्य सेवक म.रा.काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य कर्मचारी संघटनेच्या (शासनमान्य संघटनेच्या ) प्रमुख पदावर आहेत व आरोग्य कर्मचा-यांच्या विवीध मागण्यान्यायीक हक्कासाठी ते सक्षमपणे काम करत आहेत. आरोग्य कर्मचा-यांच्याअडी अडचणी, मागण्या, व न्यायीक हक्कासाठी संघटनेचे पदाधिकारी यांनी |जिल्हा मुख्यालयी राहुन सेवा देणे उपरोक्त संदर्भ क्रमांक ३ च्या शासन ननियमात असुन आज रोजी दोनही आरोग्य सेवक हे बदली पात्र नाहीत,किंबहुना त्यांची कामाबददल वा ईतर कोणतीही तक्रार नाही, केवळमागासवर्गीय संघटनेचे पदाधिकारी म्हणुन त्यांना व्देशभावनेने टार्गेट केले जात असल्याचे दिसुन येते. ४) कोवीड सारख्या साथउद्रेकात जिवाची पर्वा न करता आहोरात्र आरोग्य सेवा
देणारे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांचे १०, २० व ३० वर्षे कालबदध पदोन्नती, पदोन्नती, आंतरजिल्हा बदली, वैदयकिय देयके, शिकाऊ कालावधी मान्यता, भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव, कायमपणाचे फायदे, नेहमीच उशिराने होणारे पगार ईत्यादी सारखे अनेक विषय मागी लागत नाहीत असे असतांना सन्माननिय लोकप्रतिनीधी मंजुर आकृतीबंधानुसार नियुक्तीचे ठिकाणी पदस्थापीत / कार्यरत व उत्कृष्ठ काम करणारे आरोग्य सेवक यांचे बदलीसाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत, असे संघटनेचे ठाम मत आहे.
५) सदरहु कर्मचा-यांवर नाहक अन्याय झाल्यास संघटनेमाफंत लोकशाही मुलतत्वानुसार निर्णय घेण्यात येईल हे नम्रपणे नमुद करत आहोत.