Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण

जळगाव : रुग्णालयात लागणाऱ्या आगीवर प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करता याव्या याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, मुंबईचे सहायक संचालक संजय पाटील, तज्ज्ञ सदस्य विक्रम देसाई हे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणामध्ये सांगितले की, आग रोखण्यासाठी मॅन्युअल फायर अलार्म प्रणाली कार्यान्वित ठेवली पाहिजे. त्यासह अग्निशमन दलाला कळवून आपल्या कर्मचारी वर्गाला धीर देऊन योग्य सूचना करीत आग प्रतिबंधक उपकरणांचा वापर केला पाहिजे. वेळोवेळी फायर ऑडिट करून घ्यावे, असेही मार्गदर्शन त्यांनी केले. आग लागल्यावर आणि आग आटोक्यात आणण्यासाठी करायच्या कृतीबाबत संजय पाटील आणि विक्रम देसाई यांनी माहिती दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) च्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. हे काम वेगाने व पारदर्शक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपस्थित सहभागींनी प्रश्नोत्तराद्वारे माहिती जाणून घेतली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ.अरुण कासोटे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, रुग्णालयाच्या अग्नी सुरक्षा प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. वैभव सोनार, सदस्य डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. डॅनियल साजी विविध विभागांचे विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, डॉ बाळासाहेब सुरोसे, डॉ. किशोर इंगोले, डॉ.अंजली वासडीकर, डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. गणेश लोखंडे, अधिसेविका प्रणिता गायकवाड आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंधनकारक नाहीच-भुषण महाजन

Next Post
प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंधनकारक नाहीच-भुषण महाजन

प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंधनकारक नाहीच-भुषण महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo