<
तत्कालीन प्रांताधिकारी श्री .जितेंद्र पाटील व तत्कालीन तहसीलदार श्री .अमोल निकम यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ?
जळगाव -(प्रतिनिधी)- तालुक्यातील भादली येथून जवळच गेल्या वर्षांपासून मे.आर.बी . घोडके नामक कंपनीचे काम सुरु आहे .या ठिकाणी कामावर किमान लाखो ब्रास वाळू वापरण्यात आली असून , हि वापरण्यात आलेली वाळू वैध होती कि अवैध हा प्रश्न मात्र गेल्या वर्षांपासून जसा चा तसाच आहे. सदर कंपनीच्या कामावर वापरण्यात आलेल्या वाळूची माहिती जळगाव येथील दिपक सपकाळे यांनी माहितीच्या अधिकारात जळगाव येथील तत्कालीन तहसीलदार श्री .अमोल निकम व जळगाव येथील तत्कालीन प्रांताधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांच्याकडे मागितली होती, परंतु सदर दोन्ही अधिकारी यांच्या शासकीय बदल्या होऊन गेल्यात पण यांनी कुठलीच माहिती उपलबद्ध करून दिली नाही .
या कंपनीच्या कामावर असलेल्या वाळू साठ्याचा पंचनामा जळगाव चे तत्कालीन प्रांताधिकारी श्री .जितेंद्र पाटील यांनी केला होता व संबंधित कंपनीला मोठ्या प्रमाणात दंड देखील आकारण्यात आला होता.
याबाबत सविस्तर माहिती मिळावी म्हणून दिपक सपकाळे यांनी जळगाव येथील प्रांत कार्यालयात काही महिन्यापूर्वी माहितीच्या अधिकाराखाली सदर पंचनाम्याची प्रत व कारवाई ची माहिती मागितली होती . परंतु सदर अर्ज तहसील कार्यालय कडे वर्ग करण्यात आला . माहिती प्रांत कार्यालयाशी संबंधित असतांना तहसील कार्यालयाकडे अर्ज वर्ग करण्याचे कारण काय ?
सदर कंपनीच्या कामावर वापरण्यात आलेली वाळू नेमकी आली कुठून ? कारण मागील वर्षी सर्व वाळू ठेके बंद होते . कोणत्याही वाळू गटाचा लिलाव झालेला नव्हता मग या कामावर लाखो ब्रास वाळू आली कशी ? तत्कालीन तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी या ठिकाणी पंचनामा करून देखील कारवाई का केली नाही ?करावी केली किंवा नाही याची देखील माहिती दडवून ठेवण्यात आली आहे .या सर्व प्रकरणात नक्कीच तत्कालीन तहसीलदार यांनी आर्थिक मलिदा खाल्ला असावा त्यामुळेच सदर प्रकरणाची कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. वरील प्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन अर्जदार यांना जळगाव चे प्रांत अधिकारी श्रीमती चौरे यांनी दिले आहे. तसेच जळगाव चे तहसीलदार श्रीमती वैशाली हिंगे यांनी घोडके कंपनीला दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार अशी अपेक्षा माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ते दिपक सपकाळे यांनी व्यक्त केली आहे .