जळगाव - कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ऑनलाइन पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या एलएलएम व एल एल बी वर्गातून दोन विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव शी संलग्न असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील एल एल बी या अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष २०२० ची पाचव्या सत्राची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. अंतिम सत्राच्या निकालानंतर झालेल्या ऑनलाइन पदवीदान समारंभात डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील पदव्युत्तर परीक्षेत यशवंत कोंडू चित्ते व एल एल. बी. तृतीय वर्ष अभ्यासक्रमातून चंद्रकांत रमेशचंद्र अग्रवाल यांना सिव्हिल प्रोसिजर कोड या विषयासाठी सुवर्णपदक बहाल करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्थान श्रीमती गोदावरी पाटील,गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.केतकी पाटील, विधी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य गाडगे एस. जी. यांच्यासह इतर प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
Like this:
Like Loading...