<
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) – राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार, दि. 10 जुलै, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 10 जुलै, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मुबंई विमानतळ येथून खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.15 वाजता माजी आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे याच्या जयकिसनवाडी येथील निवासस्थानी सात्वंन भेट. दुपारी 12.30 वाजता जळगाव महानगरपालिका येथे भेट व आढावा. दुपारी 1.00 वाजता जळगाव येथून शिरसोली-वावडदा-सामनेर-नांद्रा मार्गे पाचोरा शहरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या घरी आगमन व राखीव.
दुपारी 1.45 वाजता पाचोरा येथून भडगाव शहराकडे प्रयाण, दुपारी 2.00 वाजता भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या कै. शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा. दुपारी 2.15 वाजता भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प (डपिंग ग्राऊंड) लोकार्पण सोहळा. दुपारी 3.00 वाजता भडगाव शहरातील बाळद रोड येथील साईबाबा मंदिरास सदिच्छा भेट. दुपारी 3.10 वाजता भडगाव येथून पाचोरा शहराकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता पाचोरा शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा.
दुपारी 3.30 वाजता पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा. दुपारी 3.40 वाजता पाचोरा शहरातील पांचाळेश्वर मंदिराजवळील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा. दुपारी 3.50 वाजता पाचोरा शहरातील स्मशानभूमी जवळील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा. दुपारी 4.00 वाजता पाचोरा शहरातील माजी मंत्री स्वर्गीय के. एम. बापू पाटील व्यापारी संकुल, भाजीमंडई लोकार्पण सोहळा. दुपारी 4.45 वाजता पाचोरा येथून नांद्रा-सामनेर-वावडदा-शिरसोली मार्गे जळगावकडे प्रयाण. सायं 5.30 वाजता जळगाव विमानतळ येथे अगामन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.