<
पाचोरा(प्रतिनिधी)- येथे स्वामी लॉन्स येथे मराठी पत्रकार संघाच्या दिमाखदार कार्यक्रमात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषणदादा मगर यांचा कोरोनासारख्या भयावह परिस्थिती उल्लेखनीय कामगिरी केली.
देशमुखवाडी भागातील स्वतःचे हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोलाचे योगदान दिले होते.याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ.भूषणदादा मगर सांगितले की; हा आरोग्यसेवेचा यज्ञ यापुढे सुरू ठेवण्याचा संकल्प केला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, यासह जिल्हाभरातील शिवसैनिक, आणि धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.