<
तब्बल 4 किलो बाळासह रूंद कटीराची सुखरूप प्रसृती संपन्न.
बाळास कृञिम श्वासोच्छ्वास देऊन जीवनदान
मोरांबा-(प्रतिनिधी) -11 जुलै रोजी रविवारी आज अतिदुर्गम व डोंगराळ भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबा ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे रतनबारा येथील पहिल्या खेपेच्या मातेची गुंतागुंतीची प्रसृती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे व आरोग्य सेविका श्रीमती पी टी वसावे यांनी यशस्वीरित्या सुखरूप पार पाडली.
मातेच्या कटीराची रुंदी कमी असल्याने व बाळ चार किलोचे असल्याने प्रसृतीमार्गात अर्धा तासभर अडकून पडले होते माञ डाॅ प्रमोद सोनवणे व श्रीमती वसावे यांनी युक्तीपुर्वक ( फंडल व इपि इ. )सदर प्रसृती करून स्री-बाळ सुखरूप बाहेर काढले, माञ बाळाने आईच्या पोटात शी केल्याने बाळाने शी गिळून घेतली होती सबब ते रडत नव्हते तरीही बाळाला कृञिम श्वासोच्छ्वास आदी ( Suction, Ambubag Resuscitation,Cardiac massage) सोपस्कार पार पाडत अखेर रडवलेच…!! व प्रसृती कक्षातील आमच्यासह, आशाताई, नातेवाईक या सर्वांच्या चेहर्यावर आनंदाश्रू आलेत.
बाळाची व आईची तब्येत आता ठिक असून अशा कठिण प्रसृती करत डोंगराळ भागातील जनतेला उत्तम आरोग्य देण्यासह माता व बाल मृत्यूदर रोखण्यात खारिचा वाटा उचलून मोरांबा आरोग्य केंद्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी प्रतिक्रिया डाॅ सोनवणे यांनी दिली.
यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ स्वप्नील मालखेडे यांचे मार्गदर्शन तर वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रफुल्ल पठाडे सर, डाॅ योगेश्वर पाटील आदींसह सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभत आहे असेही डॉ. प्रमोद सोनवणे यांनी कळविले आहे.