<
जळगाव- जिल्हातील जलसंपदा विभागातील रिक्त जागेवरील विविध पदे रिक्त असल्याने पदस्थापना भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंञी जयंत पाटील यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी मंञालयात त्यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
जळगाव जिल्हातील जलसंपदा विभागांर्तगत अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,उप अभियंता,कनिष्ठ अभियंता,स्थापत्य अभियांञिकी सहाय्यक प्रथम लिपीक,वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक,वाहनचालक,दप्तर कारकून,कालवा निरीक्षक,मोजणीदार,कालवा चौकीदार शिपाई,सी.आर.टी.आदी संवर्गातील एक एक नव्हे तर तब्बल 786 अधिकारी कर्मचारी रिक्त झाल्याने या रिक्त जागेवर नव्याने पदस्थापना करणे आवश्यकता आहे.
एका कर्मचारी अधिका-यांकडे दुप्पट तिप्पट कामाचा अतिरिक्त बोझा अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने ऐन पावसाळयात जलसंपदा विभागातील महत्वाचे कामकाज असते मोठ्या तलावातील तुडूंब पाण्याने भरले तर पाण्याचा विसर्ग दरवाजे सोडण्यासाठी कर्मचारी नसल्याने ही खूप मोठी समस्या भेडसावणार आहे.
तरी जलसंपदा मंञी जयंत पाटील साहेबांनी रिक्त पदस्थापना लवकर भरावी अनेक प्रलंबीत काम जलसंपदा विभागात असून पदस्थापना लवकरच नव्याने भरले तरी अनेक कामांना वेग येईल अशी मागणी केली आहे.मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर पदभरण्याचे आश्वासन दिले.