<
शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन
बोदवड-(संजय वराडे) -आज सकाळी सुमारे १०-०० च्या सुमारास शहरातील विवेकानंद नगर येथिल साधारणपणे ४५०ते ५०० नागरिक [रहिवासी ] ज्यांना महसुल प्रशासनाने इ.स.१९७२ मध्ये गट क्र.५७९ व गट क्र.५८० मध्ये सुमारे ९५ नागरिकांना घरे बांधून दिली व तशी नोंद भुमीअभीलेख खात्यात नोंद केली.तद्नंतर सुमारे ३४८ अतिक्रमीत रहिवासी यांचे अतिक्रमण कायम करणे १९९९ मध्ये आकारणी करण्यात आलेली होती.व त्यासाठी भुमीअभिलेख खात्यामार्फत मोजणीही झाली होती.मात्र मोजणी सीट अधिकृत न झाल्यामुळे तेव्हा पासून आजतागायत हा विषय अडगळीत पडून होता.मात्र नगरपंचायत झाल्यावर आलेल्या सरकारी योजना व विशेष बाब म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना यासाठी नागरिकांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी हा विषय बोदवड येथील सामाजिक कार्येकर्ते शांताराम कोळी यांचे कानावर घातला त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कानावर घातला तात्काळ शिवसेना स्टाईलने आज मोर्चा काढण्यात आला व नगरपंचायत प्रशासकीय यंत्रनेस तंबी देण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी मोर्चेकरी बांधवाना शब्द दिला येत्या दोन दिवसात समिती नेमून या प्रकरणी निर्णय घेण्यात येईल .
Sanju bhau ????????