<
जिल्हा जागृत जनमंच ने पत्रकार परिषदेत केला खुलासा
जळगांव-(धर्मेश पालवे)-शहर महानगरपालिका ही संस्था विपरीत आणि विस्कळीत स्वरूपाच काम करत असून, जनहीताकडे दुर्लक्ष करत असल्याचं आपण बऱ्याच वेळा वाचलं व पाहिलं असेल. मागील २०वर्षांपासून आता पर्यंत केलेल्या कामाबाबत येथील नागरिक,करदाते,व शेतकरी सह व्यापारी असमाधानी आहेत असं निष्कर्ष ही काढले गेल्याच प्रत्येकाने एकल असेल. शहरातील विकासात्मक आणि प्रगतीपथावर सुरू असणाऱ्या कामाकडे पाहता जिल्हा जागृत जनमंच चे श्री. शिवराम पाटील ,ईश्वर मोरे, नाटेकर व डॉ आशिष जाधव यांनी शहरात कोर्ट जवळील मोराको हॉटेल येथे आज दिनांक २२ आगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली.
शहरातील रस्ते पुन्हा पुन्हा बनवणे व जेथे रस्तेच नाही तेथे रस्ते व दुभाजक बनवणे,निकडीची गरज पूर्ण करण्याऐवजी व्यतिरिक्त काम महानगरपालिका आपकल्या मूळ उद्देशापासून दूर जात आहे.
समांतर रस्ते च्या नावाखाली रोड शो करून येथील प्रशासकीय अधिकारी व सेवक स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.जळगांव शहरात वाघूर नदी पाणीपुरवठा जनतेची तहान भागवत असूनही अमृत योजनेचा गवगवा आणि उदापोह केला जातो आहे, शहरातील योजनेत केलेल्या खड्डे बाबत अभ्यास केला असता लोकांना या बाबत काही एक माहीत नव्हते, कारण काम कोणते, कोण करते,किती पैसे वापरले,कितीवेळ सरकारने ही माहिती जनते करिता उपलब्ध करून दिली या प्रशांची उत्तरे अजूनही लोकांकडे नाही, माहिती अधिकारात मागवली असता ती ३२ दिवस टाळकत ठेवले गेले.
त्याच बरोबर महानगरपालिका व हुडको कर्जफेड ही ज्यांनी अपहार केला त्यांच्या कडून वसूल करून भरले जाणे अपेक्षित असताना मात्र मनपा च्या ठेवीतूनच त्यातून हे कर्ज फेडले आहे.
गाळेधारकांचे प्रश्न जळगांव चे नगरसेवक किंवा आमदार सोडवत नाहीत, हा स्थानिक स्वरूपाचा प्रश्न आहे सरकारने जागा देऊन मनपाने इमारत बांधावी व ती भाड्याने व्यापारीना द्यावी असे अपेक्षीय असताना भाडे कराराचे प्रश्न वादग्रस्त ठेवले. अश्या प्रमुख आणि महत्वाच्या प्रश्नावर जिल्हा जागृत जनमंच च्या टीम ने प्रश्न उपस्तीत करत मा देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा दौऱ्यावर लक्ष केंदित करत स्थानिक प्रशासन व नेत्यांवर ताशेरे ओढले आहे.