<
प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांची उपस्थिती; गांधी रिसर्च फाउंडेशन व इन्स्टीट्यूट ऑफ एडव्हॉन्सड स्टडी यांचा उपक्रम
21 व्या शतकात आजही महात्मा गांधीजी यांच्या विचारांची अनिवार्यता का (How Gandhi Matters) या विषयावर जैन हिल्स येथील परिश्रम हॉल येथे आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. निमत्रितांसाठी असलेल्या सेमिनारचे आज (ता.23) सकाळी 9 वाजता प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व लेखक रामचंद्र गुहा यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.
जळगाव- येथील गांधी रिसर्च फाउंडेशन व शिमला येथील इन्स्टीट्यूट ऑफ एडव्हॉन्सड स्टडी यांच्या संयुक्त विद्यमाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जगाला 21 व्या शतकात विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे आजच्या समस्यांच्या निराकरणांसाठी महात्मा गांधीजींचे विचार, त्यांचे तत्वे, मुल्ये यातून समस्यांचे समाधान कसे होऊ शकते, आजही महात्मा गांधी यांच्या विचारांची अनिवार्यता का? यासह विविध विषयांवर या चर्चासत्रात मंथन केले जाणार आहे. यामध्ये भारतभरातील विविध राज्यांतील 35 निमंत्रितीत अभ्यासकांचा सहभाग असणार आहे. निमंत्रीतांसाठी असलेल्या सेमिनारचे उद्घाटन व अध्यक्षीय मनोगत प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व लेखक रामचंद्र गुहा व्यक्त करतील.