<
काही मागण्या पूर्ण करणार तर काही साठी लवकरच समिती स्थापन करून मार्गी लावणार
जळगांव- (धर्मेश पालवे)-साल २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकाला मध्ये सर्व विधीशास्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाणे केलेल्या अन्याबाबत हे उपोषनास बसले होते, २०१८-१९ या सदर वर्षी च्या झालेल्या विधी परीक्षेच्या निकालास विद्यापरिषद सभेच्या ठराव क्रमांक ए -७०/२०१९दि २५/०५/२०१९ हा लागू करने, विधी शाखेच्या विद्यार्थ्याना ४० ची पासिंग व ४०ची ऍग्रिगेट लागू करणे,आणि व विद्यापीठाणे ४०ची पासिंग बाबत तोंडी दिलेले आश्वासन पूर्ण करणे या प्रमुख मागन्यायासाठीचे हे उपोषण होते.दि२२पासून सुरू असलेले हे उपोषण उपोषणार्थी च्या मागण्या पाहता, त्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मा भ प्र पाटील यांच्या समोर लेखी समर्थन घेत, मॉडेल अन्सरशीट हे संबंधित अधिकारी मंडळाकडे देण्यात येईल,उत्तर मराठीत लिहिले जावे म्हणून या करिता अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली जाईल,त्याचबरोबर प्रथम वर्ष एल एल बी व द्वितीय वर्ष बी ए एलएलबी तृतीय वर्ष एलएलबी व चतुर्थ वर्ष बी ए एल एल बी या वर्ष्या च्या २०१९च्या परीक्षेकरिता ATKT ही पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी लागू राहील अश्या उपोषणार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर पर्याय काढून देत लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्या आहेत .दि.२२पासून सुरू असलेल्या उपोषणाला काल संध्याकाळी 6 वाजता उशिरा सोडण्यात आले. सदर उपोषण सोडते वेळी विष्णू भंगाळे, मौलाना आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख,साहस फाऊंडेशन अध्यक्ष सरीता माळी, अमीत माळी, भारती म्हस्के, निवेदिता ताठे, विद्यापिठाचे प्राध्यापक यांच्या उपस्थितीत सर्व उपोषणार्थी अभिजित रंधे, श्रीकांत सोनवणे, निलेश जाधव, निलेश भालेराव, कोमल गायकवाड, अंकित चव्हाण, प्रतीक चव्हाण, वैभव पाटील यासह इतर विद्यार्थी हजर होते.