<
जळगाव, (जिमाका) दि. 18 – पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातंर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदूरबार या तीन जिल्ह्यांसाठी जळगाव येथे नवीन मंडळ कार्यालय सुरू करण्यास शासन मान्यता प्राप्त झाली आहे.
या नवीन मंडळ कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, आकाशवाणी केंद्रामागे, जळगाव येथे सोमवार 19 जुलै, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर हे असून विशेष अतिथी म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील या उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार सर्वश्री. चंदुभाई पटेल, गिरीश महाजन, चिमणराव पाटील, संजय सावकारे, किशोरआप्पा पाटील, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील, सौ लताताई सोनवणे, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि जळगाव कार्यालयाचे अधीक्षक अभियंता शिवशंकर निकम यांनी केले आहे.