<
जळगांव(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तर्फे आपणास व शिक्षण अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार आपल्याला निवेदनातून कळवला होता व त्या पासून विद्याथ्याना व पालकांना यातून दिलासा मिळाला अशी मागणी केली होती. नंतर स्मरण पत्र ही आम्ही दिले होते.
परंतु, अद्यापही कुठलीच कारवाई आता पर्यंत घेण्यात आलेली नाही. म्हणून २३ जुलै पासून आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून लोकशाही पद्धतीने जलत्याग व अन्नत्याग साखळी उपोषण करत आहोत. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होळपळून निघाला आहे.
अशातच काही खासगी शाळा या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फी आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे.त्यात काही शाळा ह्या कोविड सुरू होण्या आधी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत.
पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची,तसेच फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना काढले जात आहे.अश्या या परिस्थितीत सर्व सामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भरत आहे तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन फीस घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी अन्यथा महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन येत्या दोन दिवसात अन्यत्याग आंदोलनाची(आमरण उपोषण) करेल असे स्मरण पत्र ही दिले परंतु अजून ही काही त्या वर विचार झाला नाही म्हणून आम्ही येत्या २३ जुलै रोजी लोकशाही पध्दती जलत्याग अन्नत्याग उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर येथे करत आहोत.