<
जळगांव(धर्मेश पालवे):-महाराष्ट्रभर सुरू असलेल्या भाजपा च्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनसंवाद, कार्यकर्ते व मत संकल्पना मांडणे, त्याच बरोबर राजकीय खेळी खेळण्यासाठी जनतेचे आशीर्वाद मिळवा असा मानस करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांचा दौरा सुरू आहे. हा दौरा आज रोजी २३ तारखेला ठीक ४ वाजता जळगांव शहरातील सागर पार्क येथे भल्या मोठ्या सरकारी ताफ्यात स्थानिक प्रतिनिधींसोबत येऊन उपस्थित झाला. यावेळी व्यासपीठावर बोलतांना मुख्यमंत्र्यानी आम्ही जिल्ह्यातील मनपा चे कर्ज, जिल्हा बँकेचे कर्ज,हुडको कर्ज, शेतकरी हिताचा निर्णय,त्याच बरोबर समांतर रस्त्याच्या मुद्यावर काम केले असून जिल्ह्यातील जनतेच्या बाजूने सरकार सक्षम उभे असून, मनपाने या वर्षात मिळालेल्या निधीतून ५०% निधी खर्च करून दाखवावा, म्हणजे आम्ही १०० कोटी निधी अजून देऊ, असे आश्वसन ही जिल्ह्यातील जनतेला दिले. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री मा गिरीशभाऊ महाजन यांनी येणारे सरकार हे आपलेच असून सामान्य माणसाचा विकास करणे हा आमचा अजेंडा आहे, मात्र विरोधकांनी त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी EVM च्या नावाखाली बोंबा मारत असल्याचा खुलासा केला.
मात्र, भारतातील तरुणांची वाढती बेरोजगारी,जातीच्या नावाखाली होणारी मॉब ब्लिचिंग ,शिक्षणाचे होत असणारे खाजगीकरण , आरक्षण,आदी मुद्यावर दोघेही मंत्र्यांनी बोलणे टाळले. जिल्ह्यात गाजनारे चोपडा येथील अल्पवयीन आदिवासी मुलींवर चा अत्याचार, क.ब.उत्तर महाराष्ट्र विद्यपीठ मधील विधीशास्र च्या विदयार्थ्यांवरील अन्याय,शहरातील वाढती गुन्हेगारी,माध्यमिक शिक्षकाचे पेंशन, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न,ऐरणीवर सोडलेे,वास्तविक जिल्ह्यातील खड्डे, समांतर रस्ते हुडकोचे कर्ज,गाडेधारकांचे जटिल प्रश्न, शहरातील वाढती बेरोजगारी,शैक्षणिक व सामाजिक समस्या आज मितीला सोडवणे महत्वाचे आहेत, याकडे स्थानिक सरकारचे लोक प्रतिनिधी व मुख्यमंत्री साहेबांनी जाणिवेने लक्ष देणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष व बोलणे टाळले आहे. वरील गोष्टीकडे पाहता असे दिसून येते की भाजपा सरकार कडून महाजनादेश यात्रे च्या निमित्ताने महाराष्ट्र व जिल्ह्यातील जनतेला राजकीय समीकरणे करण्यासाठी वापरले जात आहे, आणि जनतेच्या मूळ प्रश्नांना हत्यार करून जनतेची दिशाभूल करत असल्याचं दिसत आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.