<
अमळनेर(प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील कृषिदूत शुभम देसले यांनी ग्रामीण कृषी जागृतता कार्यक्रम 2021-22 या अंतर्गत खेडी येथे माती परीक्षण व सुयोग्य कथांचे नियोजन या विषयावर शेतकऱ्यांचा समवेत प्रात्यक्षिक पार पाडले. मातीचा नमुना घेत असताना अनेक शेतकरी बांधव चुकीच्या पद्धतीचा अवलंब करतात काही वेळा पीक लावल्यानंतर देखील माती परीक्षण करतात हीच कमतरता हेरून शुभम देसले यांनी सुयोग्य पद्धतीने मातीचे नमुने घेण्याचे पद्धतीचा अवलंब करून दाखवला. पिकास कोणत्या अवस्थेत कुठले मूलद्रव्य कमतरता असते पीक वाढीस कुठले मूलद्रव्य कामी येतात या विषयावर सखोल विश्लेषणकरून देखील मातीत मूलत: कुठल्या मूलद्रव्यांची कमतरता आहे कुठले खत कधी वापरावे व माती परीक्षण करताना मातीचे नमुने कोणत्या पद्धतीने गोळा करावे माती परीक्षण साठी कोणत्या प्रयोग शाळेत जावे व माती परीक्षण झाल्यानंतर माती परीक्षण अहवाल चा अभ्यास करून सुयोग्य खतांचा पुरवठा कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तरी उपस्थित शेतकऱ्यांनी या विषयावर समाधान व्यक्त करुन कृषिदूत शुभम देसले यांचे आभार मानले.