<
जळगाव – डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात २७ जुलै रोजी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फेे वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाच्या परिसरात वड, पिंपळ, जांबूळ अशा १२ विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ.प्रशांत वारके, परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, उपकुलसचिव अतुल बोंडे, उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.एन.डी.पाटील, प्रा.आर.बी.पाटील, प्रा.अजय गवांडे, प्रा.संजय सपकाळे, प्रा.संदिप पाऊलझगडे, प्रा.माधुरी कावळे, प्रा.सुमैया शेख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी नदिम तडवी, सागर अजनाडकर, भुषण इंगळे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.