Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यातंर्गत पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 27 – राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागातील शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन ते आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. जेणेकरुन ते कृषि उत्पादकतेत भर घालण्यासाठी योगदान देतील तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यातंर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

या पिक स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही 11 पिके समाविष्ठ आहेत. पिक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खरीप हंगामातील मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी अंतिम दिनांक 31 ऑगस्ट, 2021 अशी आहे.
पिक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील संबधित पिकाखालील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. किमान स्पर्धेक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावी. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थीचे किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस5 हजार रुपये दुसरे बक्षिस 3 हजार रुपये, तिसरे बक्षिस 2 हजार रुपये,
जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रुपये, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, विभागीय पातळीसाठी पहिले बक्षिस 25 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 15 हजार रुपये, तर राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये, तिसरे बक्षिस 30 हजार रुपये आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी व कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण

Next Post
डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo