<
पाळधी – (प्रतिनिधी ) – तालुका धरणगाव सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील पाळधी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून आजूबाजूला वीस ते पंचवीस खेडे लागून असल्याने या परिसरातील नोकरदार, छोटे व्यवसायिक, सामान्य नागरिक यांना हजारोंच्या संख्येने सुरत येथे जावे यावे लागत असते मात्र सध्या या मार्गावरील पॅसेंजर गाड्या बंद असल्याने पाळधी परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.
भुसावळ ते नंदुरबार गाडी सध्या सुरू असून मात्र पुढील प्रवासासाठी प्रवाशांना जादा पैसे खर्च करून इतर वाहनां वर अवलंबून राहावे लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने किमान सध्या सुरू असलेली गाडी क्रमांक ०९००७ व ०९००८ह्या सुरत भुसावळ अपडाऊन गाड्यांना पाळधी येथे किमान दोन मिनिटांचा थांबा देऊन प्रवाशांचे हाल थांबवावे अशी अपेक्षा असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा परिसरातील प्रवाशांनी व्यक्त केली आहे.