<
नैसर्गिक आपत्ती योजनेतंर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश सुपूर्द
जळगाव, (जिमाका) दि. 5 – मौजे निंभोरा, ता. धरणगाव येथील रहिवाशी भागवत भिका पाटील यांचा शेतातून घरी परत येत असताना निंभोरे लगत खैऱ्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने 17 जुलै, 2021 रोजी मयत झाले.
शासनाच्या नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत स्व. भागवत पाटील यांच्या वारस पत्नी श्रीमती मालुबाई भागवत पाटील यांना चार लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीनकुमार देवरे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.