<
जळगांव(चेतन निंबोळकर)- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील उर्दू भाषेचा प्रचार व प्रसार करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुरस्काराचे नुकतेच राज्य उर्दू साहित्य अकादमी ने सन २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर केले होते. या पुरस्कारामध्ये प्रसार माध्यमातील प्रिंट मिडियात विशेष पत्रकारीता करणार्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कार मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. २०१७ साठीचा उर्दू पत्रकारिता (फ्री लान्स जर्नलिस्टेट) चा पुरस्कार येथील अकीलखान ब्यावली यांना जाहीर झाला. मुळ यावल चे रहिवाशी असलेले अकीलखान ब्यावली मागील पंचवीस वर्षापासून विविध माध्यमाद्वारे उर्दू साहित्य निर्मिती व पत्रकारीता करत आहे. त्यांचे लेख, वृत्तांकन इत्यादी विशेष करून दैनिक उर्दू टाइम्स मुंबई व इतर उर्दू वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असतात. ते के.के.गर्ल विद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच २०१८ साठीचा पत्रकार पुरस्कार येथील पत्रकार व दैनिक उर्दू टाइम्स(मुंबई) चे प्रतिनिधी सईद पटेल यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. लोहारा(पाचोरा) येथील मुळ रहिवाशी असलेले सईद पटेल मागील तिस वर्षापासून उर्दू साहित्यातील लघुकथा, वृत्तांकन इत्यादी द्वारे सतत लेखन करणारे पत्रकार साहित्यिक आहे. दोघांना पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.