<
जळगांव(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी कारणीभूत आहेत.
पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास यावर उपाय म्हणजे पर्यावरण संवर्धन हिच काळाची गरज ओळखून कृती फाऊंडेशनच्या वतीने नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयातील बिनतारी संदेश विभागाचे अफजल तडवी, विवेक माळवे यांच्या मार्गदर्शनात अँनेलक फूड अँड स्पाईसचे संचालक उद्योजक अमरनाथ चौधरी, आनंद सहाने यांच्या हस्ते निसर्गोत्सव आनंदोत्सव मोहिमे अंतर्गत नाशिक(विल्होळी) येथे वृक्षारोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चार जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. यापुढे मात्र रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृतीची गरज निर्माण झाली पाहिजे.
हीच भावना सदर उपक्रमात आवर्जून मांडली गेली. निसर्गोत्सव आनंदोत्सव या मोहिमेची संकल्पनाफाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष तथा जळगांव पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांची होती. प्रसंगी समन्वयक दिपाली विसपुते, भाग्यश्री महाजन व विल्होळी ग्रामस्थ उपस्थित होते.