<
अभियांत्रिकीचे शिक्षणानंतर नोकरी मिळावी, ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते आणि ती रास्त आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ने उद्योगक्षेत्रातील तज्ञांशी कायम संपर्कात राहून, ट्रेनिंग साठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्यामुळे प्लेसमेंटचे उद्दिष्ट गाठण्यास मदत झाली. खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेबाबतची भीती दूर व्हावी, यासाठी ठोस भूमिका घेतली. शैक्षणिक वर्ष 2019 – 21 मध्ये 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या महामारी दरम्यान रोजगार देण्यात आले , ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. महाविद्यालयाने गेल्या 5 वर्षात 1200+ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली.
जळगाव: उद्योग क्षेत्रातील आर्थिक उलाढाल , तंत्रज्ञानात होणारे सततचे बदल, रोजगाराला कौशल्य क्षमतेची मिळालेली जोड व बदलती आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्कृती, यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ब्ध होत आहे . या संधी चा उपयोग आज विध्यार्थी मोठ्या संख्ये ने घेत आहे. या मध्ये कोणत्याहि महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची महत्व ची जवाबदारी असते.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची नियोजनबद्ध रित्या आखणी केल्यास विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याच्या संदर्भात नक्कीच यशस्वी होता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जळगाव येथील “श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय” होय. महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने २०१९-२१ या दोन शैक्षणिक वर्षात, नियोजनबद्धकामगिरीच्या जोरावर ४००+ विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यात यश संपादन केले आहे. दरम्यान निवड झालेले सर्व विद्यार्थी महाविद्यालयातील बायोटेकनॉलॉजि, केमिकल इंजि., सिव्हिल इंजि., कम्प्युटर इंजि., इलेक्टिकल इंजि., इ अँड टीसी इंजि., इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजि. या ८ अभियांत्रिकी विद्याशाखांत व MBA च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून बहुतांश विद्यार्थ्यांना संबंधित कंपनी कडून नोकरीला रुजू होण्यासंदर्भातील पत्र सुद्धा प्राप्त झाले आहे.
विविध क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त उद्योगसंस्थानी शैक्षणिक वर्ष २०१९-२१ दरम्यान महाविद्यालय परिसरात मुलाखती साठी महाविद्यालयाने ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म प्रदान केला होता आणि IBM, ACCENTURE, MIND TREE, TUDIP, BYJUS CAP GEMINI, EPITOME,, Bajaj Allianz , Cognizant, WIPRO, Spectrum Electrical Industries Ltd., Acme Sujan Chemicals Pvt. Ltd., Dollar Advisory & Financial Services, Milind Rathi Structural Consultants,Life Insurance Corporation, e-Zest, Samrat Trades या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यासारख्या बहुराष्ट्रीय कंपनी चा समावेश आहे. नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना कंपनी तर्फे कमाल १० लाख व किमान २.४ लाख रुपयाचे वार्षिक वेतन जाहीर करण्यात आले आहे. महाविद्यालयाने गेल्या 5 वर्षात 1200+ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली . महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया महाविद्यालय परिसरात उमटत आहे.
“तज्ञांच्या सल्ल्याने विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन”
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आणि औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे तंत्रज्ञान व कौशल्ये,याबाबत महाविद्यालय ने सतत नियोजन बद्ध प्रयत्न केले आहे . महाविद्यालयातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांसाठी उद्योग क्षेत्रातील तज्ञ व जाणकारांच्या सल्लामसलतीने विशिष्ठ व ठराविक कालावधीचे प्रशिक्षण व नोकरी चा संधी उपलब्ब्ध करून दिल्या . याचे फलित आज आपल्याला मोठे संख्या ने विद्यार्थ्यांची निवड बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये झालेली दिसत आहे.