<
“सैनिकाच्या हस्ते करूया ध्वजारोहण भारतीय तिरंग्याचे,
होईल साजरे “अमृत महोत्सवी वर्ष” स्वातंत्र्याचे”.
सुलज (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) – भारतीय स्वातंत्र्यलढ्यास येत्या दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून संपूर्ण भारत देशात राष्ट्र प्रेम वाढावे, राष्ट्राप्रती आपुलकी, जिव्हाळा निर्माण व्हावा, तसेच स्वातंत्र्य लढाईचा इतिहास आणि महत्व आधुनिक काळातील जनतेला, युवक-युवतींना, शाळकरी मुलामुलींना माहिती रहावा, शिवाय जगातील एकसंघ राष्ट्र म्हणून आपल्या भारत देशाची ओळख कायम टिकून राहावी, भारतीय संविधान आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र सेवा देणारे, जिवाची आहुती देणारे, रक्ताचे पाट वाहणारे स्थल, वायू आणि जल सेनेतील सर्व स्तरावरील जवान निःस्वार्थपणे सेवा दिल्यामुळे सर्व भारतीय नागरिक निश्चिंत व सुरक्षितपणे जगू शकत आहोत, त्यांच्या सन्मानासाठी, सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व होऊ इच्छिणाऱ्या नव सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट २०२१ च्या स्वातंत्र्य दिनापासून अमृत महोत्सवी वर्ष निमित्त प्रत्येक गावात राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यासाठी सेनेत कार्यरत असणाऱ्या किंवा नुकतेच सैन्यातील सेवा देऊन निवृत्त झालेल्या गावातील किंवा निमंत्रित भारतीय जवानाला सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या हस्ते प्रत्येक वेळेस संदर्भ पत्रात नमूद केलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यरत जवान किंवा नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करावे.
राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजवंदन संहिता आणि भारतीय सैन्याप्रती असलेल्या भारतीय नागरिकाचे असलेले देशप्रेम, राष्ट्रभक्ती वाढविण्यास मदत होऊ शकेल, सोबतच सेवेत कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त सैनिकाचा सन्मान होईल, त्यासाठी, आपल्या स्तरावरून तत्काळ आदेश निर्गमित करून प्रत्येक गावात सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा साजरा करून अविस्मरणीय क्षणाचा अहवाल संबधित विभागाकडून मागवावा, अशाआशयाचे निवेदन ईमेल द्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्यसाचिव, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी इत्यादींना ईमेलव्दारे व ग्रामसेवक आणि सरपंच यांना ईमेलसह प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनाची मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यालयाने तत्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाही साठी प्रशासकीय विभागाचे मा. सचिव विकास रस्तोगी यांच्या कडे पाठविल्याचा email प्रा. नितीन घोपे (गुरु), राज्य समन्वयक, शिक्षणक्रांती यांना आज दिनांक: १३/०८/२०२१ रोजी दू. १२.२६ मी. प्राप्त झाला आहे.
Young Army Force Sulaj च्या सर्वसदस्यांनी सामूहिक पणे मेहनत घेऊन हे निवेदन सर्व स्तरापर्यंत पोचविण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परीश्रम घेतले.