<
पालक मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी मा अभिजित राऊत याच्या हातून देऊन गौरविण्यात आले
जळगाव – (प्रतिनिधी) – दि 15 ऑगस्ट रोजी जळगाव येथील सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षे पासून उल्लेखनीय कामगिरी बजावलेले भूषण दिलीप लाडवंजारी यांच्या तुळजाई बहुद्देशीय संस्थेला केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्रकडून
जिल्हा पुरस्कार सण 2019-20 पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व 25 हजार रुपये इ देऊन गौरविण्यात आले
केंद्र शासनाचा नेहरू युवा केंद्र या विभागाकडून हा जिल्हा पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयात पालक मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी मा अभिजित राऊत याच्या हातून वितरीत करण्यात आला.
या वेळी पुरस्कार घेताना संस्थचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी,अजिंक गवळी, अनिल बविस्कर,आकाश धनगर तसेच जिप चे सेवानिवृत्ती कक्ष अधिकरी सुभाष लाडवंजारी आदी.
गेल्या 15 वर्षा पासून तुळजाई संस्था सामाजिक क्षेत्रात विविध विषयावर पथनाट्य,कार्यशाळा, विविध विषयांवर ग्रामपंचयत ते जिल्हा परिषद कर्मचारी, अधिरीकारी व लोकप्रतिनिधी याना प्रशिक्षणे देत आहे तसेच मागिल कोविड च्या भयंकर परिस्तित संस्थच्या माध्यमातून करोना काळात धान्य वाटप असेल,मास,सेनेटयार वाटप असेल तसेच जनतेला वेळोवेळी जागृत करण्याचे व विविध माध्यमातून कोविड19 मध्ये विविध समाजपयोगी कार्य संस्थेने केले आहे.या पूर्वी देखील शासनाच्या विविध पुरस्कार देऊन संस्थेला गौवरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार मिळाला बदल नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक नरेंद्रजी,अजिंक्य गवळी लोकसंवाद संस्थेचे अध्यक्ष शिरीष तायडे,किरण लाडवंजारी,दीपक सपकाळे,रोहित सूर्यवंशी, अनिल बाविस्कर,रवींद्र पाटील,जय आकाश धनगर ,गणेश माने,संदीप तांदळे,हेमत मांडोळे प्रमोद लाडवंजारी,योगेश सोनवणे,अशोक मोपरी,मनीष चव्हाण कृष्णा पाटील व प्रल्हाद चौधरी तसेच जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी अभिनंदन केले.